मुंब्रा/ कळवा विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू. सहा.आयुक्त सचिन बोरसे यांचा अनधिकृत बांधकामे विरोधी धडक मोर्चा.
ठाणे, ०३ सप्टेंबर :- अनेक दिवसांपासून गाजत असलेला अनधिकृत बांधकामे विषय आज सहा.आयुक्त सचिन बोरसे यांनी निकालात काढला असून गेल्या आठवड्या पासून व आज ही बोरसे यांनी अनेक विविध ठिकाणची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. जगात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवले असतांना समस्त मनुष्य जातीला जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता.संपूर्ण जगाची,देशाची,राज्याची यंत्रणा मानवाचे जीव करोना पासून वाचविण्यासाठी अहोरात्र व्यस्त झाली असताना च संधीचा फायदा काही अप प्रवृत्तीचा लोकांनी घेत प्रशासनाची व्यसत्तापाहुन अनधिकृत नियम व कायदे धाब्यावर बसवून सुरू केली होती.ठाण्यासह कळवा, मुब्रा, वर्तकनगर, वागळे, बाळकुंम, व इतर ठिकाणी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू होती मात्र मुब्रा व कळवा विभागात सुरवातीची वाढती कोरोना रुग्ण संख्या अहोरात्र मेहनत घेऊन, नियमांचं कडक पालन करून पर्यायी लोकांचा रोष पत्करून लोकहिता साठी सहा.आयुक्त सचिन बोरसे यांनी नियंत्रणात आणली.वेळोवेळी सूचना व कारवाई करूनही अनधिकृत बांधकामे करणारी तथाकथित बिल्डर्स मंडळीची अरेरावी व मुजोरी वाढतच होती.ठाणे मनपा आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त व वरिष्ठ मनपा अधिकारी अशोक कुमार बुरूपुल्ले यांचा आदेशानुसार सहा.आयुक्त सचिन बोरसे यांनी स्वतः उपस्थित राहून आज कळवा व मुब्रा विभागात अनेक मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त केली व विवीध ठिकाणी गुन्हे ही दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.कोरोना लोकडाऊन काळात झालेल्या अनधिकृत बांधकामे व त्यांच्या सभांधित लोकांवर बोरसे यांनी कडक कारवाई केल्याने ठाणे मनपात सर्वत्र कौतुक होत आहे.सदर कारवाई पुढे ही चालू राहणार असल्याचे म्हटले जात आहे

No comments:
Post a Comment