नगरसेविका साक्षी ताई चौधरी यांच्या प्रयत्नाना आले यश !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड नगर पंचायतीच्या कार्यसम्राट नगरसेविका साक्षीताई संतोष (बाबु )चौधरी यांच्या प्रयत्नाना यश आले असुन नुकताच त्यांच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी प्रभागात कुठेही आसन व्यवस्था नव्हती. ती साक्षीताई यांच्या प्रयत्नाने व खासदार कपिलजी पाटील साहेब आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या शुभआशीर्वादाने भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव डी वाय फाउंडेशन संस्थापक दयानंदजी चोरघे साहेब यांच्या सौजन्याने नागरिकांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून दिले आहेत. त्याबद्दल सर्व प्रभाग वासीयांकडून दयानंदजी चोरघे साहेब नगरसेविका साक्षी संतोष चौधरी यांचे खूप आभार व्यक्त करण्यात आले.
खरे तर मुरबाड नगर पंचायत मध्ये प्रथमत:च निवडून आल्यावर कुठलाही अनुभव नसताना नागरिकांची जबाबदारी, निवडणुकीत दिलेली आश्वासने,त्यातुन निर्माण झालेली समाज सेवेची आवड पाहता साक्षीताईने केवळ प्रभागा पुरतेच मर्यादित न राहता ,आपल्या कडे काम घेवून येणा-या प्रत्येक गरजू माणसाला आपले पणा दाखवून त्याच्या पाठीशी खंबिरपणे उभ्या राहून,केलेले कार्य कोणाला न विसरण्या सारखे आहे.या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करताना प्रभागाती रस्ते,सांडपाण्याची गटारे,शौचालये,रोडलाईट,पाणी, अंगणवाडी, बालवाडी तील,लहान बालके,कुपोषित बालके,गरोदर माता, यांच्या समस्यांवर ही भर दिला. कोरोना संकट काळात, घरोघरी गोरगरीबांना, जिवनावश्यक वस्तुचे वाटप,भाजीपाला वाटप,ह्या गोष्टींवर भर दिला. स्मशानभुमितील नळपाणी पुरवठा, लाकडे उपलब्ध होण्यासाठी चे प्रयत्न, गणपती विसर्जनासाठी गणेश घाट,आणि निर्माल्य कळशासाठी नगर पंचायत मध्ये धरलेला हट्ट, ह्या गोष्टी ,साक्षीताईंच्या समाज कार्याचीच साक्ष देत आहेत.

No comments:
Post a Comment