Thursday, 3 September 2020

ह.भ.प.शंकर महाराज शिंदे यांची वारकरी सांप्रदाय व अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड !

ह.भ.प.शंकर महाराज शिंदे यांची वारकरी सांप्रदाय व अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड ! 
     
  
      मुरबाड {मंगल डोंगरे} : ठाणे- जिल्ह्यासह पालघर, रायगड, नाशिक, जालना, पुणे, नगर जिल्हात आपल्या अमोघ वाणीने किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करुन  श्रोत्यांना मंञमुग्ध करणारे मुरबाड तालुक्याचे भुमीपुञ ह.भ.प.शंकर महाराज शिंदे यांची कुंभार संघ प्रणित वारकरी सांप्रदाय व अध्यात्मिक आघाडीच्या महाराष्ट्र  राज्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.          
महाराष्ट् प्रदेश कुंभार समाज संस्थेचे राज्य अध्यक्ष सतिश दरेकर यांनी अध्यात्मिक आघाडीची कार्यकारणी जाहिर केली. शंकर महाराज शिंदे हे मुरबाड मधिल माल्हेड गावचे असून ते गेली अनेक वर्ष राज्यभर किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन व अध्यात्माची सेवा देत आहेत.त्यांच्या या सेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार सूद्धा मिळाले आहेत . 
संसार, मोह मायेत गुंतून ञस्त झालेल्या जिवाला संसार सुखाचा होऊन त्याला स्वानंद सुख मिळावे म्हणुन शिंदे महाराजांचे कार्य अखंडपणे सुरु आहे राज्यात त्यांचा चाहता वर्गही मोठा असून त्यांच्या या निवडीने तालुक्यासह सर्वञ त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...