Saturday, 5 September 2020

शिक्षक दिनानिमित्त स्त्री शिक्षणाचे आद्य जनक आणि जननी अर्थात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांना कोटी-कोटी विनम्र अभिवादन !

शिक्षक दिनानिमित्त स्त्री शिक्षणाचे आद्य जनक आणि जननी अर्थात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांना कोटी-कोटी विनम्र अभिवादन ! 


    स्त्री शिक्षणाचे आणि शेतकरी, कष्टकरी अशा..बहुजनांच्या शिक्षणाचे आद्यजनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले..! 

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, हेच भारतीय शिक्षणाचे आद्यजनक आहेत. महात्मा तात्यासाहेब फुले यांनी भारतात पुणे येथे शाळा सुरु करण्यापूर्वी या भारत देशात शेतकरी, कष्टकरी अशा बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केली नाही. 
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुळेच बहुजनांना शिक्षणाची संधी मिळाली. शिक्षणाचे महत्व सांगणारे विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनीच मांडले. बहुजनांना शिक्षण मिळाल्याशिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही, यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखर्चाने शाळा सुरु केल्या. चार वर्षात २० शाळा सुरु केल्या. विनावेतन (मोफत) बहुजनांना व स्त्रियांना शिकविले. स्वत:चे पैसे खर्च करुन शिकवले. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही, असे सांगणाऱ्या धर्मग्रंथाच्या विरोधात जाऊन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचे बीज रोवले. १९ आक्टोंबर १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगाकडे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाबाबत निवेदन सादर केले. राष्ट्रपिता म. जोतीराव फुले यांच्या विचार-कृती-उदयाबरोबर नवयुगाची तुतारी फुंकली गेली.
आमच्या या समाजिक, शैक्षणिक क्रांतीच्या उभय दांपत्यास अर्थात स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले आणि स्त्री शिक्षणाचे जनक तथा आद्य पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांना शिक्षक दिनानिमित्त कोटी-कोटी विनम्र अभिवादन ! 
*पत्रकार- विश्वास बळीराम गायकवाड बोरघर / माणगांव रायगड.*

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...