Friday, 18 September 2020

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन टिटवाळ्यातील गायिकेने कवितेच्या माध्यमातून केली जनजागृती !

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन टिटवाळ्यातील गायिकेने कवितेच्या माध्यमातून केली जनजागृती ! 


कल्याण (संजय कांबळे) : काही दिवसांपूर्वी अंत्यत कमी असलेल्या कोरोनोच्या व्हायरस विषाणूने आता कल्याण ग्रामीण भागात हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तरीही लोक म्हणावी तितकी काळजी घेताना दिसत नाही त्यामुळे या कोरोनाची भयानकता रोखण्यासाठी टिटवाळ्यातील कु नेहा दशरथ केणे या सेलिब्रिटी गायिकेने आपल्या कविता व गाण्याच्या माध्यमातून कोरोना कोव्हीड बाबतीत जनजागृती केली असून त्याचा फायदा देखील दिसून येत आहे.
कोरोनाने शहरी भागात हाहाकार उडविला असताना त्या मानाने ग्रामीण भागात मात्र तो म्हणावा इतका पसरला नव्हता. पण अनेक दिवसांपासून लावलेला लाॅकडाऊण, यामुळे वैतागलेली जनता, यात मिळालेली शिथिलता आणि अशातच आलेला गणेशोत्सव यामुळे नागरिकांनी कोणतीही बंधने पाळली नाहीत. त्यामुळे कोरोनाला आयती संधी मिळाली. व त्याने ग्रामीण भागात हातपाय पसरायला सुरुवात केली. ऐवढ्या दिवसाची मेहनत, कष्ट, प्रयत्न फुकट गेले. कारण कालपर्यंत कल्याण तालुक्यात ८१६ पाॅझिटिव रुग्णाची संख्या झाली तर अॅक्टिव पेंशंट १२८७ इतके आहेत. मृत्यूची आकडेवारी ८७ वर गेली आहे तसेच बरे होणा-याचे प्रमाण १६७६ इतके आहे. त्यामुळे याची दखल टिटवाळा शहराजवळील वासुद्री गावच्या कु नेहा दशरथ केणे या गायिकेने घेतली." माझा परिसर, माझी जबाबदारी" या घोषणे अंतर्गत तिने कोरोना च्या अनेक कविता करुन आपल्या गोड आवाजात गाऊन लोकांना ऐकवत जनजागृती करण्यास सुरुवात केली.
करोना आला पाहुणा म्हणून, वाटले जाईल महिनाभर राहून 'पण सगळा अंदाज चुकतच गेला, त्याचा मुक्काम वाढतच गेला, तोंडावर मास्क आले, हातावर सॅनिटायझर, इथपर्यंत ठीक होते रे पण शेवटचे चार खांदे देखील पोरखे झाले रे! 
अशा अनेक कविता नेहा विविध प्रकारच्या कार्यक्रमातून बोलून व गाऊन जनजागृती करित आहे. 
तसे पाहिले तर टिटवाळा जवळील वासुद्री गावची कु नेहा केणे हिने वयाच्या दुसर्‍या वर्षापासुन गाणी गाण्याला सुरुवात केली. वडील दशरथ केणे हे वारकरी संप्रदायातील नामांकित भजनी बुवा तर आई सुरेखा केणे या शास्त्रीय संगीतातील पारंगत, त्यामुळे आपसूकच तिला सफ्तसुरांची देणगी आई वडिलांकडून मिळाली.परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विविध प्रकारच्या कार्यक्रमातून नेहा चमकू लागली. ती इयता ८वीत असताना नॅशनल पातळीवर अॅड टिव्ही वरील संगीत कार्यक्रमात निवड झाली. प्रसिद्ध संगीतकार शेखर, गायक शान, निती मोहना यांच्या मार्गदर्शनाखाली तिने गाणी गायली. नेहा चा जन्म वारकरी संप्रदायातील असल्याने तिच्या गायिकेला सुरुवात हरिपाठ, पसायदानाने होत होती. यादरम्यान तिची कलर्स मराठी टिव्ही चॅनेल वरील सुर नवा ध्यास नवा या स्पर्धेत निवड झाली. संगीतकार, गीतकार गायक अवधूत गुप्ते, शाल्मली खोब्रागडे आणि महेश काळे यांनी तिची निवड केली. या दरम्यान  पाहुणे प्रसिद्ध गायिका आशा भोसले, डॉ सलिल कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, अभिनेते सुबोध भावे, आणि सचिन पिळगावकर संगीतकार अशोक पत्की, श्रीधर फडके लक्ष्मीकांत प्यारेलाल, वैशाली सामंत, साधना सरगम आदींनी तिच्या गायिकेला दाद दिली. सचिन यांनी तर तिच्या गाण्यावर खुश होऊन तिला शंभर रुपये बक्षीस दिले हे ती सांगायला विसरली नाही. यानंतर झी युवा चॅनेल वरील युवा सिंगर एक नंबर येथेही तिची निवड झाली होती. त्यामुळे नेहा सेलिब्रिटी म्हणून परिसरात परिसरात परिचित असून तिचा एक चाहता वर्ग आहे. त्यामुळे ती या माध्यमातून कोरोना ची दहाकता व घ्यावयाची काळजी या बाबतीत प्रसार व प्रचार करित आहे. सध्या ती ठाणे येथे संगीताचे पुढील धडे घेत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण गाणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती जाणून तिने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...