Thursday, 17 September 2020

मुरबाडच्या कु. मानसी तोंडलीकरने केली डॉक्टरेट पदवी संपादन !!

मुरबाडच्या कु. मानसी तोंडलीकरने केली  डॉक्टरेट पदवी संपादन !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड ग्राम पंचायतचे माजी सरपंच, बांधकाम व्यावसायिक आणि सर्वांचे परिचित महेंद्र उर्फ नाना तोंडलीकर यांची सुकन्या ,तर माजी नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका, तसेच भाजपा महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षा शितल ताई तोंडलीकर यांची पुतणी  कु.मानसी तोंडलीकर हिने नुकताच वैद्यकीय क्षेत्रातील आपलं शिक्षण पुर्ण करून डॉक्टरेट हि मानाची पदवी संपादन केल्यामुळे मुरबाड शहर व परिसरातुन तिचं कौतुक केले जात आहे.
       कु. मानसी तोंडलीकर हि गेल्या चार वर्षांपासून नवी मुंबई येथील डि.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयातुन वैद्यकीय शास्राचे शिक्षण घेत होती. नुकताच तिचे पदवीचे शिक्षण पुर्ण झाले असुन, तीने या विद्यालयातुन MDS हि पदवी संपादन केल्यामुळे  तोंडलीकर कुटुंबियांच्या तसेच मुरबाड करांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.तर मानसीच्या रुपाने मुरबाड करांच्या सेवेत एका नवीन मोठ्या डॉक्टरची भर पडली असुन मुरबाड करांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

No comments:

Post a Comment

मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!

मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मो...