Sunday, 6 September 2020

डझनभर व्हीआयपी लोकप्रतिनिधी व शेकडो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरप वारीनंतरही कोव्हीड केअर सेंटर तात्पुरत्या आॅक्शिजनवर?

डझनभर व्हीआयपी लोकप्रतिनिधी व शेकडो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरप वारीनंतरही कोव्हीड केअर सेंटर तात्पुरत्या आॅक्शिजनवर?


कल्याण (संजय कांबळे) : झपाटय़ाने वाढणा-या आणि मोठ्या प्रमाणात नागरिकरण झालेल्या म्हारळ वरप कांबा पावशेपाडा या गावासह इतर अनेक गावे व शेजारच्या तालुक्यातील काही कोरोना पाॅझिटिव रुण्गांना फायदेशीर ठरणारे कल्याण तालुक्यातील वरप येथील कोव्हीड केअर सेंटर सुरू व्हावे म्हणून आतापर्यंत डझनभर व्हीआयपी लोकप्रतिनिधी व त्यांच्या बरोबर शेकडो वरिष्ठ अधिकारी यांनी वरप कोव्हीड केअर सेंटर अशी वारी केली मात्र तब्बल पाच महिन्यांनंतर देखील हे केअर सेंटर तात्पुरत्या आॅक्शिजनवर ठेवण्यात आले असून अद्याप ते सुरू झाले नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना पाॅझिटिव रुण्गांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडवल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका, मुरबाड तालुक्यातील काही गावे आणि खास करून म्हारळ वरप कांबा या वाढणा-या लोकवस्तीच्या गावासाठी कल्याण प्रांताधिकारी याच्या कार्यालयात महसूल जिल्हा परिषद व आरोग्य विभागाचे अधिकारी यांची मे २०२० मध्ये एक बैठक झाली व यामध्ये वरप येथील राधा स्वामी संत्सग येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने कल्याण तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांनी अहोरात्र मेहणत घेऊन कोरोना कोव्हीड सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. साधारणपणे २०० बेडचे हे कोव्हीड केअर सेंटर असणार होते.


कमी लक्षणे असलेले परंतु कोरोना पाॅझिटिव पेंशंट येथे ठेवण्यात येणार होते. त्यामुळे कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात हे सेंटर या गावासह इतर आजूबाजूच्या लोकांना देखील फायदेशीर व सोईचे ठरणार होते.
वरप येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये कारपेट, ताडपत्री, बेड, पाणी लाईन, शौचालय याची सुविधा जवळपास पूर्ण होत असताना उल्हासनगर व परिसरातील वाढणा-या कोरोनोच्या वाढत्या पेंशंटच्या काळजी पोटी कल्याण चे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आदीना घेऊन वरप कोव्हीड केअर सेंटर ला भेट दिली. व येथील प्रशस्त जागा बघून येथे २०० बेडच्या जागी ५०० बेडचे आयसीयू युक्त हाॅस्पिटल बनविण्याचा सल्ला दिला. तेव्हाच यांना ग्रामीण भागातील लोकांशी काही घेणे देणे नाही हे स्पष्ट झाले. कारण म्हारळ वरप कांबा येथील पेंशंट ना कुठे हाॅस्पिटल मिळत नव्हते, मिळालेच तर उपचार होत नव्हते, वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला होता. त्यामुळे हे केअर सेंटर लवकरच सुरू व्हायला हवे होते. पण झाले नाही.
उलट या नवीन सल्ल्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उल्हासनगर पालिका आयुक्तांना पत्र पाठवून हे केअर सेंटर आयसीयू करण्याची जबाबदारी सोपविली. त्यामुळे अधिक वेळ गेला ४/५ महिन्यानंतर देखील अद्यापही येथे कोणत्याही प्रकारची आयसीयू यंत्रणा दिसून येत नाही उलट ज्या कांबा येथील ताबोर भवन यांनी त्याची इमारत कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कोव्हीड केअर सेंटर साठी दिली नाही. त्याच ताबोरवाल्यानी उल्हासनगर येथील पालिका आयुक्तांना तात्काळ दिली. यावरुन काय सिध्द होते.
दरम्यान या काळात ठाणे जिल्हा ग्रामीण चे शिवसेना प्रमुख व राज्यमंत्री दर्जा प्राप्त झालेले प्रकाश पाटील, झेडपीचे अध्यक्षा सुषमा लोणे खासदार डॉ श्रीकांत शिंदे,उपसभापती रमेश बांगर, आमदार किसन कथोरे, पंचायत समितीचे सभापती व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, असे डझनभर लोकप्रतिनिधी व तलाठी, ग्रामसेवक पासून ते तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी असे शकडो अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी वरप कोव्हीड केअर सेंटर ला भेटी दिल्या मात्र कृती शुन्य कारण इतक्या कालावधीनंतर आता आहे त्या स्थितीत हे केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना जिल्हय़ावरून देण्यात आल्याचे खात्रीलायक माहिती आहे. 
वरप येथील कोव्हीड केअर सेंटर चा सध्याच्या विचार केला तर, येथे जनरेटर नाही, रस्ता धड नाही, पेंशंटसाठी व कर्मचारीवर्ग यांच्या साठी जे शेड उभारले होते. त्यावरील ताडपत्री पावसाने कधीच उडवून टाकली. व्हॅन्टीलेटर नाही. आहेत, रुग्णवाहिका बे भरवसे, आॅक्शिजन नळकांडी आहेत, ती अपुरी, कोव्हीड केअर सेंटर परिसरात सर्प, विंचू भटकी कुत्री अशा प्राण्यांचा मुक्तपणे वावर अशा अवस्थेत हे चालू झाले तर काय होईल? यांचा विचार केला का? आणि विशेष म्हणजे तूम्हाला अशा अपु-या सोईसुविधेत हे सुरु करायचे होते तर इतका वेळ का व कोनासाठी घालवला? हे नाटक कशासाठी असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. 
सध्या गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. ज्या गावांमध्ये  अद्याप पर्यंत एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नव्हता. त्या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना ने शिरकाव केला आहे.ग्रामीण भागात दिवसेंदिवस पेंशंट वाढत आहेत. कल्याण ग्रामीण भागात ६७० च्या आसपास कोरोना पाॅझिटिव पेंशंट असून मयत २७ झाले आहेत तर २०० च्या आसपास अॅक्टिव पेंशंट आहेत. 
सध्या पावसाळी वातावरण आहे, मलेरिया, डेंग्यू टायफॉइड, कावीळ असे आजार आहेतच त्यातच पुढे नवरात्र महोत्सव, दशरा, दिवाळी येतेय. त्यामुळे यावर आताच परिणाम कारक उपाय शोधला पाहिजे, अन्यथा आपल्या तालुक्याची अवस्था बैल गेला आणि झोपा केला अशी नको व्हायला, इतकेच म्हणूनच वरप येथील कोरोना कोव्हीड केअर सेंटर सर्व सोईसुविधा युक्त सुरू व्हावे हिच ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...