आम आदमी पार्टीचे कल्याण पुर्व येथे सतर्कता व ऑक्सिमीटर अभियान संपन्न !!
कल्याण : संपूर्ण देशात कोरोना (कोविड-१९) ने थैमान घातले असून दररोज रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. आज संपूर्ण भारतात रुग्ण संख्या ४० लाखांवर तर महाराष्ट्रात ९ लाखांच्या जवळ पोचली आहे. अशा गंभीर परिस्थितीत नेहमीच जागरूक राहून कार्य करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा निलम निलेश व्यवहारे यांनी नागरिकांसाठी कल्याण पुर्व येथे सतर्कता अभियान राबविले.
या अभियानात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व श्रमिक विकास कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश मुरलीधर व्यवहारे उपस्थित होते. यावेळी नागरिकांना देशातील परिस्थितीची जाणीव करून कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी स्वत:च घेणे गरजेचे आहे हे समजावून सांगितले व मास्क, सुरक्षित अंतर, व स्वच्छता यांचे महत्त्व सांगून ऑक्सिमीटर मार्फत सर्वांची तपासणी केली.
या अभियानासाठी नागरिकांनी आम आदमी पार्टी व श्रमिक विकास कामगार संघटनेचे आभार व्यक्त केले.


No comments:
Post a Comment