*अनाथांचे नाथ...*
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
कल्याण,दि. ०५सप्टेंबर२०२०रोजी हिंदुमहासभा आणि वंदेमातरम् प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज टिटवाळा, तालुका कल्याण येथील सौ.अक्षदा भोसले संचालित "अंकुर बालविकास केंद्र" तसेच गुरवली, तालुका कल्याण स्थित सौ. दिपा गांगुर्डे संचालित राइट्स ऑफ वुमेन फॉउंडेशन "आईची सावली बालभवन" येथे राहणाऱ्या निराधार अनाथ मुलांना धान्य व खाऊ वाटप करुन राष्ट्रधर्म अन् सामाजिक बांधिलकीची जाणीव जपण्याचा प्रयत्न केला.
कला व ज्ञान यांनी सर्वगुण संपन्न अशी ही मुले ज्यांना आधाराची व योग्य दिशा देण्याची गरज ओळखून अंकुर बालविकास केंद्र आणि आईची सावली बालभवन उत्तमरित्या कार्य करत आहेत. आज आणि यापुढेही सदर बाल संस्थाना शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.. शेवटी
।। वसुधैव कुटुम्बकम।।
हिच शिकवण आपली हिंदु संस्कृती सर्व जगाला देते अस हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अॅड.रणधीर सकपाळ यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना मांडलेत.धान्य व खाऊ यांचे वितरण हिंदु व्यापारी सभेचे राष्ट्रीय प्रभारी श्री.आनंदसिंह देउपा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी हिंदुमहासभा आजीवन सदस्य व वन्देमातरम् प्रतिष्ठान हितचिंतक गौतम दास, वन्देमातरम् प्रतिष्ठान हितचिंतक उपेंद्र चोपडेकर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment