*भाजपा ठाणे ग्रामीण जिल्ह्याची कार्यकारणी जाहिर*.!!
मुरबाड, {मंगल डोंगरे} :-
भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व भिवंडी लोकसभेचे खासदार कपिलजी पाटील व भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाणे जिल्हा ग्रामीण ची कार्यकारणीची निवड करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर निवडक पदाधिकाऱ्यांमध्ये सदर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रदेश सदस्य व जिल्हा प्रभारी बाबाजी काठोळे ,ओबीसी मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर , युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील ,मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव , मुरबाड शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे यांसह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकारणीत भिवंडी ग्रामीण, शहापूर ग्रामीण व शहर, बदलापूर शहर, अंबरनाथ ग्रामीण इ वेगवेगळ्या मंडळासह मुरबाड ग्रामीण व शहरातून नितीन मोहपे यांची जिल्हा संघटन सरचिटणीस, तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून उल्हास बांगर, खंडू मोरे, दिपक खाटेघरे, विलास देशमुख, व जिल्हा चिटणीस म्हणून चंद्रमोहन दुगाडे व सौ.सुवर्णाताई ठाकरे तसेच जिल्ह्य़ाच्या महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून पून्हा सौ.शीतल तोंडलीकर व जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष पदी संतोषभाऊ पवार व जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून सौ.ज्योती गोडांबे , काशिनाथ धुमाळ, व रमेश उघडा यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार कपील पाटील व आमदार किसन कथोरे यांनी नविन निवड झालेल्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन व सूचना केल्या. पदांचा उपयोग फक्त आय कार्ड बनविण्यासाठी मर्यादित न ठेवता लोकांचे प्रश्न , समस्या सुटण्यासाठी व पक्ष वाढीसाठी झाला पाहिजे. अशा कानपिचक्याही नविन पदाधिकार्यांना या वेळी आमदार व खासदारांनी दिल्या. जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष घोडविंदे सर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत व सहकार्य केले.



No comments:
Post a Comment