एकीकडे ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामे विरोधी मोहीम जोरात तर वसई महानगरपालिकेची कारणे द्या मोहीम !!
वसई : वसई विरार महानगरपालिकेत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून या विरोधात अनेक समाजसेवक, पत्रकार, राजकीय नेते तसेच स्थानिक नागरिक यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत तरी अधिकारी नोटीस देतो, जाऊन बघतो, साहेबांना नेतो, आज वेळ नाही, मिटिंग आहे अशा प्रकारे वेळ काढतात त्या काळात काम पूर्ण करून विकून (सर्व सामान्य व्यक्तीला फसवून मोकळा होतो) अधिकाऱ्यांना विचारले घेणाऱ्याला कळले पाहिजे अनधिकृत बांधकामात कशाला प्रॉपर्टी घ्यायची पण ह्या अधिकाऱ्यांच्या मेहरबानी मुळे ते अनधिकृत बांधकाम अधिकृत बांधकामापेक्षा जोरात चालू असते जसे तेच अधिकृत आहे तर तिथे त्या फसलेल्या व्यक्तिंची काय चुक.
'जी' प्रभाग क्षेत्र वसई विरार महानगरपालिका अंतर्गत अहमदाबाद हायवे वरील सेठीया इंडस्ट्रीज येथील अनधिकृत बांधकाम ! संग्रहित छायाचित्र
असेच एक बांधकाम 'जी' प्रभाग क्षेत्र, वसई विरार महानगरपालिका, कामण गाव, रॉयल कंपाऊंड इथे भूमाफिया प्रदीप गुप्ता व अब्दुल यांनी या पंधरा दिवसा अगोदर अनधिकृत ६ ते ७ गाळे बनविले आहेत. या रॉयल कंपाऊंड तसेच आजुबाजूच्या परिसरात त्यांनी या आधी अनेक अनधिकृत बांधकामे केली आहेत. आता आमच्या प्रतिनिधीने सहा. आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून सर्व पुराव्यानिशी ते बांधकाम अनधिकृत आहे असे दाखवून दिले तरी अधिकारी स्टाफ कमी आहे. तर नोटीस देतो चेक करतो अशी अनेक कारणे देऊन कारवाई टाळण्याचे प्रयत्न करत आहेत. तर फोन उचलणे सुध्दा टाळत आहेत.
एखाद्या महानगरपालिकेत अनधिकृत बांधकामांपेक्षा असे अधिकारी जास्त घातक असतात.
तरी ठाणे महानगरपालिकेचा आदर्श घेऊन आयुक्तांनी आता जातीने लक्ष देऊन वसई विरार महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामांवर व अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.




No comments:
Post a Comment