मुरबाड तालुका कोरोनाचे विळख्यात ! "बळींची संख्या 20 बाधित हजाराचे घरात"
मुरबाड (मंगल डोंगरे) :-
गेल्या मार्च पासुन कोरोना कोविड--19 या जीवघेण्या विषाणुने संपूर्ण जगभरात हाहाकार माजला असताना या विषाणुवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा हि सतर्क ठेवण्यात आली असली, तरी मुरबाड तालुक्यातील आरोग्य यंत्रणा हि सध्याचे परिस्थितीत हतबल झाली असल्याने गेल्या आठवडाभरात बळीची संख्या हि 20 तर बाधितांचा आकडा हजाराचे घरात पोहोचला असल्याने तालुका आरोग्य यंत्रणेच्या कामागिरीवर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोविड 19 चा संसर्ग होऊ नये म्हणून मार्च मध्ये पहिले लाँकडाऊन सुरु झाले. त्यावेळी तालुक्यातील खेडोपाड्यातील नागरिकांनी आप आपल्या गावच्या वेशी बंद करून एक प्रकारे गावचे नाही तर तालुक्याचे वेशीवर देखील कोरोना 19 या विषाणुला रोखण्यात यशस्वी झाले. आणि तालुका कोरोनामुक्त ठेवला. मात्र आरोग्य विभाग विभागाने कोरोना विरुध्द कसे लढावे? याबाबत कोणत्याही प्रकारे उपाययोजना न राबविल्या मुळे मुरबाड तालुक्यात जुन महिन्यापासून कोरोनाने मुरबाड तालुक्यावर एक प्रकारे आक्रमण करण्यास सुरुवात केली.आणि दररोज बाधितांची संख्या वाढु लागली. त्यामध्ये आज पर्यंत बळींची संख्या 20 वर पोहोचली . तर यापुढे हि संख्या कमी होईल हि अपेक्षा मावळली आहे. कारण कोरोना या विषाणुचा संसर्ग होऊ नये म्हणुन आरोग्य यंत्रणेनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत आदिवासी भागात पेसा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुउद्देशिय कर्मचाऱ्यांना तालुक्याचे ठिकाणी प्रतिनियुक्तीवर घेतले गेले. परंतु जे आदिवासी बांधव हे आरोग्य सेवेपासुन वंचित राहतील याचा विचार तालुका आरोग्य अधिकारी यांनी केला नाही.तसेच ज्या कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली ते कुठे सेवा करतात हा संशोधनाचा विषय बनला आहे.असे असताना आपला ताफा घेऊन खेडी पाडी ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी एकदाही फिरकलेले दिसत नसुन ते आपल्या कार्यालयातच ठाण मांडून बसलेले दिसतात. दरम्यान कोरोना वर मात कशी करता येईल त्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर घेतले त्यांची नेमणुक हि गुलदस्त्यातच ठेवली असली तरी ते साथरोग आटोक्यात आणण्यापेक्षा बाधित रुग्णांची वाहतुक करण्यात मग्न असले तरी तालुक्यातील कोरोनाला रोखण्यात आरोग्य यंत्रणा हतबल ठरली असल्याने नागरिकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
***कोरोना कोविड 19 या राष्ट्रीय आपत्तीवर उपायोजना करण्यासाठी व कर्मचाऱ्यांची इतरत्र नेमणुक करण्यासाठी वरिष्ठांचे आदेश घेतले आहेत--डॉ. श्रीधर बनसोडे.तालुका आरोग्य अधिकारी. पंचायत समिती मुरबाड.**

No comments:
Post a Comment