मुरबाड नगर पंचायत च्या दुर्लक्षित पणामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय !!
"मनसे कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे लिकेज जलवाहिनी आली निदर्शनास"
मुरबाड - (मंगल डोंगरे) : गेल्या अनेक दिवसांपासून मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बागेश्वरी तलावाच्या बाजूला असलेल्या पाईपलाईन फुटुन त्यामधून हजारो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. मात्र या समस्येकडे नगरपंचायतीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष असुन, या गंभीर बाबी कडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे . याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी तात्काळ नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास ही समस्या आणुन दिली. कोणतही पद नसताना एखाद्या नगरसेवकासारखं काम हाती घेऊन स्वतः जातीने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना बागेश्वरी तळावाच्या जागेवर घेऊन गेले . व ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आज जर अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जात असेल तर भविष्यात मुरबाडमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र जिथे समस्या गंभीर तेथे मनसे खंबिर या भूमिकेतून देवेंद्र जाधव यांनी आमचे प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना सांगीतले. मला या समस्येबाबत निवेदन द्यायला लावू नका, पहिल्यांदा हजारो लिटर वाया जाणारे पाणी वाचवा. कारण मुरबाड शहराला पाणी देणारा हा एकच तलाव आहे . गेले अनेक वर्षे मुरबाड शहरात पाणी टंचाई ची फार मोठी समस्या होती. मात्र आमदार किसन कथोरे साहेबांच्या प्रयत्नाने व नियोजनाने मुरबाड करांना स्वच्छ व सुंदर तसेच मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.त्याचा विनियोग करावा अन्यथा वाढत्या लोकसंख्येला पाण्याचे दुर्भिक्ष व्हावं लागेल. त्यामुळे संबधीत अधिकारी व नगरपंचायत प्रशासन यांनी हे वाया जाणारे पाणी वाचवावे अन्यथा भविष्यात मुरबाड शहराला पाण्याची समस्या भेडसावल्या शिवाय राहणार नाही .


No comments:
Post a Comment