कल्याण तालुक्यातील गोवेली येथे कोरोना कोव्हीड रुग्णांची अॅन्टीजेन चाचणी, ग्रामीण भागात पहिल्यांदाच सुविधा!
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्णांची कोरोना कोव्हीड ची तपासणी करण्यासाठी किंवा त्यांना उपचारार्थ दाखल करण्याकरता शहरी भागाकडे चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता गेल्या ५/६ महिन्यानंतर कल्याण तालुक्यातील गोवेली येथे कोरोना कोव्हीड रुग्णांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात येणार असून त्याची सुरुवात उद्या म्हणजे बुधवार ९संप्टेबर पासून होणार आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांची सोय होणार आहे.
केवळ ठाणे जिल्हायाचा विचार केला तर शहरी भागात कोरोनाने हाहाकार माजला होता. त्यामानाने ग्रामीण भागात कोरोनाचे संकट कमी प्रमाणात होते. परंतू लाॅकडाऊण उठले तसेच गणेशोत्सव साजरा झाला. याकाळात नांगरिकानी कोणतेही नियम पाळले नाहीत किंवा सुरक्षेची काळजी घेतली नाही. त्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत जी गावे कोरोना कोव्हीड पेंशंट पासून दूर होती. त्यामध्ये कोरोना ने शिरकाव केला. कल्याण तालुक्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत दहागाव ४५०, खडवली १०५, निळजे ९० असे ६५० च्या आसपास कोरोना पाॅझिटिव रुण्गांची संख्या झाली. तर मृत्यूचा आकडा ७० च्या घरात गेला.
सध्याचा विचार केला तर कल्याण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचे हद्दीतील कोरोना पाॅझिटिव रुण्गांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे यामध्ये सुरुवातीपासून ते ३संप्टेबर २०२० पर्यत म्हारळ २१६, खोणी ७५, वरप ३२, वाकळण ४८, बेहरे ३३,मानिवली १६,घोटसई २८, कांबा १६,फळेगाव १२, गुरवली १३, पिंपरी १५, दहिसर ११, असे पाॅझिटिव रुण्ग आहेत. तर गणेशोत्सव साजरा झाल्यावर पळसोली, काकडपाडा, वेळे, गेरसे, उतने, कोसले, निंबवली, वासुद्री, गोवेली रेवती, नांदप रुंदा, शिरडोण, चौरे मसरोंडी, वसत आदी ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे या पाॅझिटिव पेंशंट कोणा कोणाच्या संपर्कात आला आहे त्यांचे काॅन्टेक शोधून त्यांची कोव्हीड चाचणी करण्यासाठी उल्हासनगर किंवा कल्याण येथे जावे लागत होते.
कल्याण ग्रामीण भागात कोव्हीड केअर सेंटर किंवा कोव्हीड अॅन्टीजेन चाचणी करण्याची सोय येथे नसल्याने शहरी भागात जावे लागत होते. यामुळे पैसा, वेळ, मानसिक व शारीरिक त्रास होत होता. अनेकांना वेळेवर उपचार व रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीव गमवावा लागला आहे. म्हारळ वरप कांबा पावशेपाडा या भागाचे आमदार कुमार आयलानी यांना किंवा माझी आमदार ज्योती कलानी यांना या भागाचे काही घेणे देणे नाही असे चित्र या कोरोनोच्या ५महिण्यात दिसून आले. हे वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर यावरून स्पष्ट होते. त्यामुळे ग्रामीण भागाला कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशातच आता गोवेली ग्रामीण रुग्णालय व कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने गोवेली येथे कोरोना कोव्हीड पाॅझिटिव रुण्गांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची" कोव्हीड अॅन्टीजेन चाचणी" तपासणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. १लॅब टेक्निशियन, एक वैधकिय अधिकारी, आणि २ चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक आठवड्याला बुधवारी ही तपासणी करण्यात येणार असून साॅब तपासणीतून पाॅझिटिव आलेल्या पेंशंट ला त्यांच्या घरी स्वतंत्र व्यवस्था असेल तर घरीच विलगीकरण केले जाईल किंवा भिवंडी तालुक्यातील भिणार येथे दाखल केले जाईल. तर आर टी पी सी आर चे नमूने मुंबई किंवा ठाणे येथे पाठविण्यात येईल असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यासाठी लागणारे किट् सध्यातरी पुरेसे आहे असेही त्यांनी सांगितले.
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना कोव्हीड अॅन्टीजेन चाचणी सुरू होणारी घटना पहिलीच असून अखेरीस गेल्या कित्येक महिन्यापासून कोरोना पाॅझिटिव पण कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णाची होणारी फरफट यामुळे थांबणार आहे.

No comments:
Post a Comment