वंचितच्या रायगड जिल्हा अध्यक्ष आणि सचिवांनी केले म्हसळा तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण...!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी आणि सागर भालेराव रायगड जिल्हा महासचिव तसेच जिल्हा पदाधिकारी मा,किरण मोरे, शरद पवार,महेंद्र जाधव तसेच संजय घाग आणि वैभव साळवी तसेच तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या समवेत गुरुवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२० रोजी दौरा करण्यात आला या दौऱ्याचा उद्देश होता की म्हसळा तालुक्यातील तळागळातील लोकाच्या समस्या जाणून घेणे त्याच बरोबर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार, पक्ष धोरणं लोकांना सांगितली सदर दौरा हा मा,महेश येलवे तसेच मा,उत्तम शिंदे (जिल्हा सदस्य) तसेच मोहन जाधव आणि तरुण तडफदार आगरी समाजाचे नेतृत्व करणारे युवा नेते आकाश पेरवी यानी नियोजन केले होते या दवऱ्या दरम्यान म्हसळा तालुक्यात सन्मानीय तालुका अध्यक्ष मा,शशिकांत पवार ( वंचित बहुजन आघाडी) आणि भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समिती यांच्या वतीने मा,जिल्हा अध्यक्ष आणि महासचिव तसेच इतर जिल्हा सदस्य यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. आणि त्या नंतर म्हसळा तालुक्यातील काळसुरी गावाला भेट देण्यात आली त्या गावी मा,आकाश पेरवी आणि गावच्या सरपंच मॅडम सौ.अरुणा नाक्ती तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. त्या गावच्या समस्या जाणून घेऊन त्या सर्व समस्यांचे वंचित च्या माध्यमातून निवारण करण्यात आले. आणि तसेच त्या नंतर मु.मेंदडी कोळीवाडा या ठिकाणी भेट दिली सदर भेटी दरम्यान मा,रमेश डोलवी आणि त्यांच्या गावच्या देखील समस्या जाणून घेतल्या आणि त्याचे निवारण करण्याचे आश्वासन दिले असता संपूर्ण ७०० लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश करण्याचे आश्वासन दिले आहे.
लवकरच प्रवेशाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे ठरले त्या नंतर रात्री कादलवाडा या गावी जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना देखील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले सदर सर्व गावच्या दोन समस्या होत्या की चक्रीवादळा मुळे झालेली नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही आणि चुकीचे पंचनामे करण्यात आले होते तसेच एक ते दोन महिने वीज नसून देखील वाढीव वीज बिल देण्यात आले त्याच देखील निवारण करण्यात येईल असे जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी आणि महासचिव सागर भालेराव यांनी सांगितले असता म्हसळा तालुक्यात सर्वत्र वनवा पेटला, आणि प्रस्थापित स्वयंभूषित कोकण भाग्यविधाते जागे झाले आणि मग त्यांच्या लक्षात आले की, वंचित बहुजन आघाडी आता सर्वसामान्य जनतेच्या समस्यां सोडवत आहे हे पाहता आपला मतदार संघ हा वंचित आघाडी आपल्या ताब्यात घेईल या भीतीने वातावरण तापले आणि प्रस्थापित नेते कडाडून जागे झाले. आणि वंचित चा झंझावात रोखण्यासाठी खुद्द म्हसळा तालुक्यात प्राशकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्या साठी म्हसळा तालुक्यात आले.
सोमवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२० रोजी रायगड जिल्हा महासचिव यांनी दिलेला शब्द पाळत थेट म्हसळा तहसील कार्यालय आणि वीज कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांन समवेत धडक दिली, आणि म्हसळा तालुका सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि संबंधित सर्व सर्कल अधिकारी यांना महासचिव यांनी चांगलेच फैलावर घेलते असता सदर चार ते पाच गावांची नुकसानभरपाई त्याचा वेळेस संबंधित अधिकारयांनी बँकेत जमा करण्यास कारवाही केली आणि ज्या लोकांचे काही कागदपत्र बाकी होते त्यांची यादी तपासून संबंधित त्या गावच्या कार्यकर्तेयाना देण्यात आल्या आणि प्राशकीय अधिकारी ज्या पद्धतीने जनतेला ह्या ठेबल वरून त्या ठेबलवर पळवत होते त्या अधिकाऱ्याना देखील समज देऊन सर्वांन समोर झापले आणि त्या नंतर कार्यालयात धडक देण्यात आली. आणि त्या ठिकाणी वाढीव वीज बिला संदर्भात महावितरणच्या म्हसळा कार्यालयात धडक दिली, आणि संबंधित अधिकाऱ्यां सोबत वाढीव बिला बाबत चर्चा केली असता असे लक्षात आले की वीजबिल हे वाढीव नसून चक्री वादळा दरम्यान वीज नसलेल्या दिवशी म्हणजे जून महिन्याचे बिल शून्य केले आहे असे बजऊन घेतले आणि ताळेबंदी मध्ये जे लोक मुंबई मध्ये होते त्यांना सरासरी बिल द्यावे आणि वाढीव बिल कमी करावे असे सांगण्यात आले. आणि ते महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आणि जे आता ग्राहकांना चार महिन्यांचे वीज बिल एकत्रित आले आहे ते नागरिक भरू शकत नाही तर ते सवलतीच्या हप्त्याने भरतील असे सांगण्यात आले आणि सुमारे ८०० च्या पेक्षा जास्त वीज बिल सवलतीच्या जनतेला जमेल अश्या कमीत कमी हप्त्यात भरता याव्यात अशी व्यवस्था संबंधित अधिकाऱ्यान कडून व्यवस्थित करून घेतली आणि आणि या सवलतीच्या हप्त्याना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त व्याज असेल असे ही तरतूद करून घेण्यात आली ह्या सर्व कामामुके म्हसळा तालुक्यात सर्वत्र जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले. आणि सर्वांच्या मते वंचित बहुजन आघाडीच्या कामाची स्तुती करण्यात आली आणि त्या ठिकाणी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते अनेक समस्या होत्या त्या देखील महासचिव सागर भालेराव यांच्या मार्फत सोडवण्यात आल्या त्यामुळे सर्व कार्यकर्ते खुश आणि हर्षित झाले. आणि म्हसळा तालुक्यातील नागरिकांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
याची दखल स्थानिक स्वयंघोषित कोकण भाग्यविध्यात्याना देखील घ्यावी लागली ही वंचित च्या कामाची ताकद आहे.
सदर दौऱ्यात वंचित चे माजी जिल्हा अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य संजयजी घाग ,महेश येलवे,उत्तम शिंदे , शशिकांत पवार तालुका अध्यक्ष ,आकाश पेरवी,मोहन जाधव, मा अरुणा नाक्ती (सरपंच काळसुरी) तसेच अनेक तालुका पदाधिकारी तालुका कोषाध्यक्ष सुमित चव्हाण आणि अन्य शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment