Thursday, 3 September 2020

घ्या उखाणा.. ! स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन.

घ्या उखाणा.. ! स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन.


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड) :‘उखाणा घेणे’ हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी येणाऱ्या नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) ऑनलाईन उखाणे स्‍पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती नि:शुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविण्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे दि.१० सप्‍टेंबर, २०२० पर्यंत पाठवावा.
उखाणे निवडीचे निकष खालीलप्रमाणे असतील:
      उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा.
          उखाणे हा 'मौखिक साहित्यिक प्रकार आहे. तरी या स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा.
          आपण सर्वसाधाणपणे आपल्या यजमानांच्या नावाभोवती उखाणे गुंफत असतो, पण या स्पर्धेत आपणाला  उखाणे समाजसुधारक,ऐतिहासिक व्यक्तीरेखा( विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती गुंफणे अपेक्षित आहे.  उखाणा स्त्री-पुरुष समानता या मूल्यांचा पुरस्कार करणारा असावा. उखाणा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांचा लांब असावा. उखाणा मुखोद्गत /पाठ असावा.
          जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हास्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेत्‍तर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ विभागीय स्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा ६ याप्रमाणे साधारण एकूण ३६ पात्र व्हिडीओ एका विभागीय स्तरावर प्राप्त होतील, ज्यामधून परीक्षकांकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेत्‍तर महिलांचे ३  क्रमांक काढून ६  व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. ६  विभागांचे मिळून ३६ पात्र व्हिडीओंमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेत्‍तर महिलांचे ३ असे ६ क्रमांक काढले जातील.
          मात्र विभागीय स्तरावर ३६ पात्र महिलांना स्‍पर्धेतील सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येणार असून  राज्‍यस्‍तरीय विजेत्या ६ महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच अधिक माहिती साठी ए-विंग, लक्ष्मी नारायण अपार्टमेंट, तिसरा मजला, रुम नं.३०१, पनवेल स्टेशन रोड, जुने पनवेल, ता.पनवेल, जि.रायगड पिन कोड-410206, दूरध्वनी क्रमांक 022-27458740, मोबाईल क्र.-9869968446, ई-मेल raigadmavim2018 येथे संपर्क साधावा, अशी माहिती महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी वर्षा पाटील यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...