कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामसेवकांना काय झालेय हेच कळेना,कधी अंदोलनाचे नाटक, कधी माघार, कधी भ्रष्टाचार तर आता शासकीय निधीचा गैरवापर, या बदनामीकारक घटनामुळे तालुक्यात चांगले काम करणा-या काही मोजक्या ग्रामसेवकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच एक प्रकार तालुक्यातील रायते पिंपळोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका व सरपंच यांच्या कडून घडला असून यांच्यावर ३९(१)नुसार कारवाई करण्याचा बडगा कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यानी उगारला आहे, त्यामुळे ग्रामसेवकांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कल्याण तालुक्यात ४६ग्रामपंचायती आणि ३०/३२ ग्रामसेवक आहेत, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो, आर्थिक बाबतीत सरपंच व ग्रामसेवक या दोघांनाच रक्कम काढण्याचा व खर्च करण्याचा जन्मसिद्ध हक्क मिळाल्याने जिथे "भाऊसाहेब व गावचे आण्णासाहेब" यांचे सुत जुळले त्या ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघड होण्याचा प्रश्नच नसतो, पण ज्या ठिकाणी इतर सदस्य थोडे अँक्टिव असतात, सरपंच हुशार असतात तेथे भाऊसाहेबांची अडचण निर्माण होते, मग अशा ठिकाणी, आपण दोघे भाऊ भाऊ आणि मिळून***खाऊ, याचे ज्वंलत उदाहरण म्हणजे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती ? काही मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार यामुळे किती सापडले, किती निंलबीत झाले, काहींची चौकशी सुरु आहे, तर काहींनी तडजोड करुन स्वत:चा जीव सोडवला, तर काही अजूनही सेंटिंग मध्ये आहेत, आपल्यामध्ये एक म्हण आहे,पुढच्यास ठेस मागचा शहाणा !! पण कल्याण तालुक्यातील ग्रामसेवक काय "शहाणे" होण्याचा प्रयत्न करताहेत असे दिसत नाही, कारण या महाशयांना असे वाटते की आपल्या डोक्यावर एखाद्या 'स्वयभूं'नेत्याचा हात आहे, मग बस्स झाले, पण कारभारातील कागदोपत्री चुकांचे काय ? असाच प्रकार तालुक्यातील रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या चैत्राली राठोड या ग्रामसेविकेकडून घडलाआहे, कल्याण तालुक्यात ज्या काही वादग्रस्त ग्रामपंचायती आहेत, त्यातीलच एक असलेल्या रायते पिंपळोली या ग्रामपंचायतीच्या पिंपळोली गावास कित्येक वर्षापासून स्मशानभूमि नसल्याने व तेथील ग्रामस्थांनी मागणी केल्याने येथील सरपंच श्रीमती पद्मश्री महेंद्र जाधव व तत्कालीन ग्रामसेविका चैत्राली राठोड यांनी जनसुविधेतून येथे स्मशानभूमि करिता ९/१०लाख रुपये मंजूर करुन घेतले, येथे स्मशानभूमि बांधण्याबाबत सर्व सद्स्यांनी सहमती दर्शवली आणि ठेकेदारांच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. स्मशानभूमिच्या कामाला गती आली तसे राजकारणाला पण पाय फुटले. ज्या जागेवर हे बांधकाम सुरू होते, ते शंकर हरी रोहणे यांना साक्षात्कार झाला कि ही जागा आपलीच आहे,मग काय तक्रारी सुरु झाल्या, जिल्हाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी अशी मालिका सुरु झाली. ४/७/२००९ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री चव्हाण,व श्री हरड यांनी ९/११/२०१९ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली व सदर स्मशानभूमिचे बांधकाम हे शंकर हरी रोहणे यांच्या खाजगी जागेतच असल्याचा अहवाल गटविकास अधिका-यास दिला, तो पर्यत ग्रामसेविका चैत्राली राठोड व सरपंच पद्मश्री जाधव यांनी ठेकेदारास ३लाख रुपये अग्रीम रक्कम स्वत:च्या स्वाक्षरीने अदा केले, त्यामुळे गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी संबधितांना खुलासा सादर करण्याच्या नोटिसा वांरवार पाठवल्या व केलेल्या कारवाईचा अहवाल मागविला पण आजतागायत तो कल्याण पंचायत समितीला पाठवला नाही, प्रथम चैत्राली राठोड, नंतर नवनाथ कोकणे, दोंदे,आणि आता पवार असे ४ग्रामसेवक झाले पण अहवाल काय पुढे सरकेना, अखेर दबाव वाढल्याने गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी ग्रामसेविका राठोड व सरपंच जाधव यांना अंतिम ३९(१)च्या कारवाईची नोटिस बजावली. यामध्ये म्हटले आहे की,जनसुविधा योजनेतंर्गत बांधकाम करण्यात आलेल्या स्मशानभूमी ही शंकर रोहणे यांच्या खाजगी जागेत करण्यात आलेले आहे, तसेच कामाची रक्कम अदा करने पूर्वी बांधकामाबाबत धावते/अंतिम मुल्यांकन न होताच ३ लाख रुपये अग्रीम ठेकेदारास अदा करण्यात आले आहे, करारनामा पाहता सदरच्या कामा करिता कोणत्याही प्रकारची अग्रीमची मागणी करण्यात आली नव्हती असे नमूद असूनसुध्दा रक्कम अदा केली, शिवाय जागेची खातरजमा न करता खाजगी जागेत बांधकाम करुन शासनाच्या निधीचा व शासकीय रकमेचा दुरूपयोग (गैरवापर) झालेला आहे यावरून शासकीय कामामध्ये हलर्गजीपणा केला असून कामामध्ये कर्तव्यपरायणता व संचोटी ठेवलेली दिसून येत नाही, त्यामुळे अदा करण्यात आलेली रक्कम ही नियमबाह्य असल्याने तत्कालीन ग्रामसेवक चैत्राली राठोड व सरपंच पद्मश्री जाधव यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन प्रत्येकाला १ लाख ५० हजार रुपये जनसुविधेच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसे न केल्यास महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चा कलम ३९(१) अन्वये कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, तसेच ग्रामसेविका राठोड विरोधात महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तवणूक) नियम १९६७ मधील कलम ३चा भंग केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे, या एकूणच प्रकरणावरुन ग्रामसेवकांनी काय धडा घ्यायला हवा तो जरुर घ्यावा, पण कल्याण तालुक्यातील ग्रामसेवक यातून बोध घेतील व सुधारतील असे वाटत नाही,यामील कारण समन्वयाचा अभाव हे देखील असू शकते.
प्रतिक्रिया :- मी मागासवर्गीय असल्याने मला जाणूनबुजून त्रास दिला जातोय, या अगोदर माझ्यावर अविश्वास आणण्याचा प्रयत्न झाला, स्मशानभूमि बांधण्यास सर्व सद्स्यांनी सहमती दर्शविली होती मग मी एकटीच दोषी कशी ? तसेच बांधकाम होई पर्यत तक्रार झाली नाही, यामागे मोठे षंडयंत्र आहे - 'पद्मश्री महेंद्र जाधव'(सरपंच-रायते पिंपळोली ग्रामपंचायत)

No comments:
Post a Comment