कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यासह संपूर्ण जिल्हातील बळीराजा विविध संकटानी ग्रासलेला असताना परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले भात पिक डोळ्यासमोर पाण्यात कुजताना पाहून शेतक-याच्या डोळ्यात पाणी आले आणि नेमक्या अशा बिकट परिस्थितीत तालुक्यातील ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्त भातपिकाचे पंचनामे करण्यास नकार दिला होता,यानंतर ग्रामसेवकांच्या या निर्णयाविरोधात जिल्हाधिका-यासह इतर सर्वच वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली, इतकेच काय तर संघटनेतील ग्रामसेवकांनी देखील हा निर्णय योग्य नसल्याचे बोलून दाखवले, अखेर या चौफेर टिकेनंतर युनियन पदाधिका-यांना उपरती आली असून आपण काम करण्यास तयार असल्याचे पत्र आज कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांच्याकडे देण्यात आले, या निमित्ताने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन कल्याण शाखा यांच्या मध्ये समन्वयाचा भरपूर अभाव असल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या काळात,आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी, सेविका, मदतनीस आणि ग्रामसेवक यांनी काम केल्याचे कोणीही नाकारु शकत नाही, यावेळी अनेकांचा जीव गेला, तर कित्येक बाधीत झाले, त्या मानाने ग्रामसेवकांचे कौतूक झाले नाही हे जरी खरे असले तरी, ग्रामसेवकाचा डायरेक्ट गावाशी पर्यायाने ग्रामस्थांशी संबध असतो, असे असताना तालुक्यातील शेतक-यावर प्रथम कोरोना, लाँकडाऊन व नंतर अवकाळी पाऊस असे एकामागून एक संकटे कोसळली, त्यांच्या डोळ्यासमोर उभे पीक आडवे झाले, भातपीक कुजताना पाहून शेतक-याच्या डोळ्यात पाणी आलं, राज्यानं सोडलं अन निसर्गाने झोडलं तर न्याय कोणाकडे मागायचा, या म्हणीनुसार बळीराजा झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर व्हावेत व सरकारकडून मदत मिळावी या आशेत असताना तालुक्यातील ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्त भात पिकांचे पंचनामे करणार नसल्याचे पत्र तहसिलदार कल्याण व गटविकास अधिकारी पंचायत समितीला दिले आणि ही वार्ता तालुक्यात वा-यासारखी पसरली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, तहसिलदार दिपक आकडे, पंचायत समिती सद्स्य किरन ठोंबरे, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, शेतकरी इतकेच नव्हे तर ज्या ग्रामसेवक युनियने पंचनामे न करण्याचे पत्र दिले. त्याच युनियनचे अनेक जेष्ठ ग्रामसेवक व पदाधिका-यानीही हा निर्णय आम्हांला मान्य नसल्याचे बोलून दाखवले. तसेच आम्ही पंचनामे करणार असेही सांगितले, यानंतर जेष्ठ पत्रकार रविद्र घोंडविदे, संजय कांबळे, सचिन बुटाला, सिध्दार्थ गायकवाड आदी पत्रकांरानी विविध दैनिकामधून चौफेर टिका केली व हा निर्णय कसा चुकिचा आहे, अंदोलनाची ही वेळ नाही, हे सत्य लोकांनसमोर मांडले, याचा परिणाम इतका झाला की समाजामध्ये ग्रामसेवकाविरोधात संताप पसरला.
त्यामुळे अखेर ग्रामसेवकांना उशिरा का होईना उपरती झाली व त्यांनी नुकसानग्रस्त भातपीकांचे संयुक्तपणे पंचनामे करण्यास ग्रामसेवक संवर्ग तयार असल्याचे पत्र आज युनियनच्या पदाधिका-याने तहसिलदार दिपक आकडे यांना दिले,तसेच सुधारीत संयुक्त पंचनाम्याचे आदेश काढण्याची विंनती केली, दरम्यान कालच्या पत्रावरुन युनियन पदाधिकारी व सदस्यामध्ये एकमत, विचार विनिमय करण्याची पध्दत नसल्याचे जाणवले, काहीनीतर उघड विरोध केल्याचेही सांगितले, तर आपले काम चोख असते त्यामुळे आपल्याला युनियनची गरज नसल्याचेही बोलून दाखवले, हे काही असले तरी राज्य, जिल्हा आणि तालुका युनियन शाखा यांच्यात समन्वय नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले,असो.
तथापि ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न प्रंलबित आहेत, ग्रामीण भागात काम करणा-या ग्रामसेवकाना अनंत अडचणींना तोड द्यावे लागते, अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना ताज्या आहेत, वरिष्ठाकडून अन्याय झाल्याने दबामुळे आत्महत्या केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत, त्यांच्या कुंटूबाचे काय होते ? याचाही युनियनने विचार करावा असे काही ग्रामसेवकांचे म्हणने आहे.

No comments:
Post a Comment