पूरग्रस्त शेतकरी आणि दुकानदार यांना सर्वतोपरी मदत होईल याची दक्षता घ्यावी !
*अधीकारी वर्गाला आदेश*
*उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत*
रत्नागिरी : आज मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई, हरचेरी भागातील पुरहानी झालेल्या भागाची पहाणी केली.
या वेळी स्थानिक शेतकरी बांधवानी आपल्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे साहेबाना सांगितले तसेच पुराचे पाणी दुकानात आल्याने नुकसान झालेले व्यावसायिक साहेबाना भेटले व त्यांनीही आपल्या समस्या मांडल्या.
या वेळी मंत्री महोदयांनी संबंधित यंत्रणेला तात्काळ व योग्य पद्धतीने पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी दक्षता घ्यावी असे आदेश दिले..
या पाहाणी प्रसंगी प्रांत सूर्यवंशी साहेब, तहसिलदार जाधव, कृषी विभागाचे अधिकारी, मंडल अधिकारी, स्थानिक तलाठी इत्यादी अधिकारी वर्ग उपस्थित होता. या वेळी बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, जिल्हा परिषद सदस्या सौ. देवयानी झापडेकर,पंचायत समिती सदस्या सौ. भातडे मॅडम, विभाग प्रमुख श्री महेंद्र झापडेकर, उप विभाग प्रमुख श्री गांगण, विभाग संघटक विलास भातडे इत्यादी मान्यवरांसह स्थानिक शेतकरी, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:
Post a Comment