कल्याण (संजय कांबळे) : कल्याण ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी भिती मात्र कायम असल्याने यंदा दस-याला घराच्या चौकटीला तोरण बांधण्यासाठी मिळणार नाही.कारण येथील आदीवाशी बांधवाणी तोरण न बणविण्याचा निर्णय घेतला आहे, कल्याण ग्रामीण भागात प्रांरभी कोरोनाचे रुग्ण अंत्यत कमी होते,लाँकडाऊण मध्ये थोडी शिथिलता मिळाल्याने व गणेशोत्सावात योग्य काळजी न घेतल्याने हे प्रमाण वाढले,कोरोनामुळे अनेकांचा बळी गेला आहे, आतापर्यत हा आकडा १०५ वर पोहचला आहे, आता थोडेसे कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे,पण नवरात्र, दसरा, आणि दिवाळी या सणामुळे हे प्रमाण वाढते की काय अशी भिती व्यक्त केली जातेय, तसे पाहिले तर आतापर्यत तरी आदीवासी समाजातील, कातकरी समाजातील कोणाला कोरोना झाला आहे किंवा कोणी कोरोनामुळे दगावला आहे असे झालेले नाही त्यामुळे यापुढे देखील आपण लोकांच्या संपर्कात जायचे नाही असा विचार वाड्या वसत्यामधील आदीवाशी बांधवानी केला आहे. त्यामुळे यंदा तोरण न बनविण्या व न विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पाहिले तर दस-याला काही दिवस बाकी असल्यापासून हे लोक तोरण बनविण्यासाठी धडपड करतात, झेंडूची फुले, कुर्डू, आणि आंब्याची पाने भातांची लोंबी या तोरणात वापरतात, याचाच मान असल्याने, कुर्डू हे संकट काळात टिकून राहण्याचे न डगमगण्याचे, भाताची लोंबी हे समृध्दिचे, आंब्याचे पान शांततेचे, मांगल्यांचे, तर झेंडू हे भक्तिचे प्रतिक माणले जाते. परंतू सध्या शेतक-यावर परतीच्या पावसाने आस्मानी संकट आणले आहे, होत्याचे नव्हते केले आहे. वाड्या पाड्यातील आदीवाशी शेतकरी पुरता नागवा झाला आहे. अशातच कोरोनाची भिती त्यामुळे यंदा तोरण न बनविण्याचा निर्णय गोवेली ठाकूरपाडा येथील गणपत हिंदोळे या आदीवाशी शेतक-याने घेतला आहे त्यामुळे यंदा दस-याला पांरपारीक तोरण मिळणार नाही असे वाटते. कारण तोरणाला भाताची लोंबी बांधायला भात कुठे शिल्लक राहिलेत,
Subscribe to:
Post Comments (Atom)
संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!
संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...

No comments:
Post a Comment