Tuesday 29 December 2020

वाय. एम.प्रोडक्शन प्रस्तुत नाट्यलेखक यशवंत माणके निर्मित मराठी लघुचित्रपट प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन !

वाय. एम.प्रोडक्शन प्रस्तुत नाट्यलेखक यशवंत माणके निर्मित मराठी लघुचित्रपट प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन !


मुंबई : (दिपक कारकर/शांताराम गुडेकर ) - 

           गुहागर तालुक्यातील मु.पो.पेवे ( खरेकोंड ) गावचे भूमिपुत्र यशवंत रामचंद्र माणके होय. नाट्यलेखन, सिनेमा कथा पटकथा, लघुपट (शॉर्टफिल्म ), मालिका लेखन, मालिका अभिनय, नाट्य दिग्दर्शन,नाट्य अभिनय या सगळ्यातून रंगभूमीवर रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या कोकण सुपुत्राने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

     *एक पाऊल रुपेरी पडद्याकडे*

            नाट्यलेखक यशवंत माणके यांनी छोटा पडदा आणि आता रुपेरी पडद्याकडे वाटचाल सुरू केली आहे. रंगभूमीवर तिहेरी भूमिका साकारल्या नंतर फिल्मी दुनिया या क्षेत्राचा अनुभव घेण्याकरिता "बाळू मामाच्या नावानं चांगभलं"/स्वराज्य जननी जिजामाता या मालिका द्वारे एका छोट्याशा भूमिकेने पहिलं पाऊल टाकत त्यांच्या त्या भूमिका अनेकांनाच भावल्या. सोनी मराठी वाहिनीवर पदार्पण करण्याची मला मिळालेली संधी म्हणजे माझ्यासाठी वेगळा अनुभव देणारी ठरली असे नाट्यलेखक माणके म्हणाले. मालिका चित्रपटात काम करून माझ्यासाठी सर्वस्व रसिक माय-बापांची सेवा सातत्याने करत राहीन असा माझा ठाम विश्वास आहे. मी नुकतंच माझ्या जन्मभूमीत तीन मराठी लघुचित्रपट निर्मिती केली आहे. मला मालिका आणि चित्रपट करण्याची इच्छा असली तरी रंगभूमी ही माझी पहिली निवड असेल. तिची सेवा मी कायम करत राहीन असे नाट्यलेखक यशवंत माणके यांनी सांगितले.

           नाट्यलेखक यशवंत माणके यांनी नव्यानं स्थापन केलेल्या वाय एम प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मित झालेल्या तीन मराठी लघुपट यांचं प्रथमदर्शनी भव्य प्रदर्शन बुधवार दि.३० डिसेंबर २०२० रोजी गुंदवली अंधेरी ( पूर्व ) येथे सायंकाळी ०६ : ०० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कोविड - १९ च्या दिवसात शासकीय नियमांचे पालन करून होणार असून या परिवाराला उपकृत करण्यासाठी सर्वांचे प्रेम व उपस्थिती हवी असे आवाहन नाट्यलेखक माणके यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...