फिट इंडिया चळवळींतर्गत शाळांनी 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी : "शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात"
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी केंद्र सरकारने फिट इंडिया चळवळ सुरू केली आहे. या चळवळी अंतर्गत राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळांनी दि.10 जानेवारीपर्यंत http:/schoolfitness.kheloindia.gov.in/static page/landing page.aapx या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.
फिट इंडिया चळवळीचा मुख्य उद्देश तंदुरुस्तीचे महत्त्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे, हा असून सन 2022 पर्यंत भारतीयांना तंदुरुस्त बनविण्याचा संकल्प फिट इंडिया द्वारे करण्यात आला आहे. या चळवळी अंतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, आश्रमशाळा, विनाअनुदानित, अनुदानित शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे.
या चाचणीद्वारे प्राप्त झालेली माहिती खेलो इंडियाच्या ॲपवर अपलोड करायची आहे. तसेच या विषयाबाबत सर्व प्रशिक्षण वर्ग खेलाे इंडिया ॲपद्वारे ऑनलाईन घेतले जाणार आहेत. फिट इंडिया अंतर्गत सर्व शाळांनी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून, दि.10 जानेवारीपर्यंत शाळांनी नोंदणी करावी, असे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी दिले आहेत.

No comments:
Post a Comment