महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चे कलाकार सन्मानित!
कल्याण (संजय कांबळे) : जनाधार निर्भीड पत्रकार सेवा संचलित एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेच्या कलाकारांचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नुकताच सातारा जिल्ह्यातील बेलवडे या गावी सत्कार करण्यात आला. त्यामुळे एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.
सेंटरींग, गवंडी, ऊसतोड, खड्डे खोदणे अशी भंयकर कष्टाची कामे करणारे, कधीही' नृत्य'अभिनय हा शब्द माहिती नसणारे सातारा जिल्ह्यातील बेलवडे बुद्रूक या गावचे नामदेवराव बल्लाळ, मोहसिन जमादार, रोहित सकटे आणि सुरेश वाडकर यांची योगायोगाने जनाधार निर्भीड पत्रकार सेवा संस्था संचलित एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेत निवड झाली. संस्थेने चार ते पाच दिवस सतत यांचा सराव घेतला, इतकेच नव्हे तर यांना प्रोत्साहन देण्यासाठी ख्यातनाम मराठी चित्रपट अभिनेते जयवंत वाडकर, मंगेश सातपुते यांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेतले. याचा परिणाम असा झाला की या सर्वांनी घेऊन निर्माते दिग्दर्शक संजय कांबळे यांनी, दिलाय तिघींनी मला धोका, हे सुपरहिट गाणे विडिओ शुंटिग केले. सध्या हे साॅग पश्चिम महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे.
त्यामुळे अतिशय ग्रामीण भागातील तरुण मुलांनी मुंबई सारख्या ठिकाणी पोहचून आपल्या कलाकृतीतून स्वत च्या पायावर उभे राहून जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी या जोरावर मराठी गाण्याचे माध्यमातून नामदेव बल्लाळ मोहसीन जमादार रोहित सकटे सुरेश वाडकर ही मुले घरा घरात पोहोचली. याचा आम्हांला अभिमान वाटतो आहे. यांनी आमच्या गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चमकले आहे. म्हणून आज त्यांचा सत्कार महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री ना पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या हस्ते घेत असल्याचे कराड दक्षिण काॅग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते यांनी सातारा जिल्ह्यातील एका छोटेखानी समारंभात सांगितले. यावेळी मा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस निर्मित 'दिलाय तिघींनी मला धोका' या गाण्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच या कलाकारांना मा मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी इंजिनिअर, भगवान मोहिते, प्रदीप भोसले, किरन मोहिते सचिन मोहिते आदी उपस्थित होते, यावेळी मा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कलाकारांचे कौतुक केले व टिमला शुभेच्छा दिल्या. (फोटो आहेत)


No comments:
Post a Comment