ठाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील आठशे बावीस जागांसाठी पंधराशेपंधरा उमेदवार निवडनूक रिंगणात? तीनशे एकोनपन्नास बिनविरोध!
कल्याण (संजय कांबळे) ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण भिवंडी मुरबाड शहापूर आणि अंबरनाथ या ६ तालुक्यातील बिनविरोध न झाल्याल्या ८२२ जागांसाठी एकूण १५१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून या सर्व तालुक्यातून ३४९उमेवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे अशा ग्रामपंचायतीमध्ये आता प्रचाराला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतचा मध्ये ठाणे ५,कल्याण २१,अंबरनाथ २७,भिवंडी ५६, मुरबाड ४४,व शहापूर ५ अशी आहे तर यामध्ये एकूण सदस्य संख्या ठाणे ५१,कल्याण २११,अंबरनाथ २४७,भिवंडी ५७४, मुरबाड ३३८,आणि शहापूर ५१ अशी आहे. उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या मध्ये ठाणे०, भिवंडी २०२७ कल्याण ७१२, मुरबाड ७५९, शहापूर १३७,असे एकूण ३हजार ६४५ अर्ज सादर केले होते. यापेकी वैध ठरलेल्या अर्जाची संख्या ३४७१इतकी तर १७४ अर्ज बाद ठरविण्यात आले. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १२१४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये भिवंडी ७२१ कल्याण २७०, अंबरनाथ ०,मुरबाड १७८,शहापूर ४५, समावेश आहे. परंतू अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण तालुक्यातील वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे या सहा तालुक्यातील ३४९ उमेदवारांची बिनविरोध झाली. यामध्ये कल्याण ४४जागा, भिवंडी १०८, मुरबाड १७८ शहापूर १९ असे ३४९ जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ८२२ जागांसाठी १५१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता प्रचाराला रंगत येणार आहे

No comments:
Post a Comment