Wednesday, 6 January 2021

बदलापूर भाजप महिला मोर्चा आघाडी कार्यकारिणी जाहीर, सरचिटणीसपदी किरण काळे !

बदलापूर भाजप महिला मोर्चा आघाडी कार्यकारिणी जाहीर, सरचिटणीसपदी किरण काळे !


प्रकाश संकपाळ, बदलापूर - भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा आघाडी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये महिला आघाडीच्या शहर सरचिटणीसपदी किरण काळे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

किरण काळे या श्रमिक पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा समितीवर कार्यरत असून त्याद्वारे त्या अनेक गरजूंना सामाजिक बांधिलकीतून मदत करतात व अनेक उपक्रमात सहभागी होतात.

या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे,खासदार कपिल पाटील, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद चे गटनेते व नगरसेवक राजेंद्र घोरपडे, नगरसेविका रुचिता घोरपडे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा शीतल तोंडलीकर, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

किरण काळे यांच्या निवडीमुळे महिला कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक पदाधिकाऱयांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...