निजामपूर विभाग रिक्षा चालक मालक संघटना आयोजित सत्य नारायण महा पूजेच्या कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांचा सत्कार !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील निजामपूर येथील निजामपूर विभाग रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
निजामपूर विभाग रिक्षा चालक मालक संघटनेच्या सत्य नारायण महापूजेच्या महाप्रसाद साठी महाड पोलादपूर माणगाव चे लोकप्रिय आमदार माननीय भरतशेठ गोगावले यांना संघटनेच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते.
सदर संघटनेच्या निमंत्रणास मान देऊन गोगावले आवर्जून उपस्थित राहिले. त्यावेळी निजामपूर विभाग रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने माणगांव महाडचे लोकप्रिय आमदार माननीय श्री भरतशेठ गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विभाग प्रमुख श्री प्रसाद गुरव,सुधीर पवार, चिले आणि विभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment