सातारा जिंकला, जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील अठराशे गावात तिघींचा धोका, गाजतोय व वाजतोय !!
कल्याण (संजय कांबळे) : बहुचर्चित एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या बॅनर खाली निर्माण करण्यात आलेल्या सुपरहीट मराठी साॅग, दिलाय तिघींनी मला धोका 'या गाण्याने सांगली, कोल्हापूर येथील कलारसिकाच्या हद् यात स्थान मिळवल्यानंतर आता संपूर्ण सातारा जिल्हा जवळपास काबीज केला असून येथील ११तालुक्यातील सुमारे १७१९ गावातील घरा घरात प्रत्येक १तासांनी जीटीपीएल सिनेमा १००नंबरवर आणि , Vto, या टिव्ही चॅनेलवर वाजत व गाजत आहे.
गेली २० /३० वर्षे महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रातून पत्रकार म्हणून कार्यरत असलेले पत्रकार संजय कांबळे यांनी जिल्हय़ातील स्थानिक नवोदित कलाकारांना संधी मिळावी यासाठी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या बॅनर खाली विविध नामांकित गीतकारांना संधी देऊन त्यांची गिते रेकॉर्डिंग केली आता हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजीराजे आहे यांच्या सेनादलाचे प्रमुख सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पावन जन्मभूमीत जन्मलेले शाहिर पोपटराव वाघमारे यांची गाणी जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. याच पाश्र्वभूमीवर गेली १५/२० वर्षे कोणीही दखल न घेतलेल्या गरीब शेतकरी असलेल्या शिवाजी पवार यांनी लिहिलेल्या 'दिलाय तिघींनी मला धोका' हे गाणे संगीतबद्ध करुन याच गावातील नवोदित कलाकार मोहसीन जमादार रोहित सकटे सुरेश वाडकर आणि नामदेव बल्लाळ तसेच मुंबई ठाणे येथील साक्षी पाटेकर, दिव्या गायकवाड गौरी पाटील वैष्णवी धायगुडे बालकलाकार हिंमाशू कांबळे आणि शांताबाई फेम सिधू गायकवाड यांना घेऊन विडिओ शुंटिग केले. यांचे उद्घाटन याच कलाकारांच्या गावातून करण्यात आले यावेळी शेकडो ग्रामस्थांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. दर अर्ध्या तासाने हे गाणे सांगली मिरज पासून ते मलकापूर, बांबवडे, सरुड, सागाव पर्यंत घराघरात NAटिव्ही चॅनेलवर गाजू व वाजू लागले आहे.
तर आता सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५३ गावे, कराड २१६, खंडाळा ६५,खटाव १३९, कोरेगाव १३८,महाबळेश्वर ११०,मान १०४,,पाटण३३८,फलटण १२५, सातारा २०५, आणि वाई १२६ अशा सुमारे १हजार ७१९ गावात व्ही टू आणि जी टी पीएल १०० नंबर या चॅनेलवरुन घराघरातून गाजत व वाजत आहे या साॅग ला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे या चॅनेलचे हेड संतोष शिंदे व प्रशांत अहिरराव यांनी सांगितले.
या सर्व यशात ऐतिहासिक तळबीड भूमितील भूमीपूत्र शाहिर पोपटराव वाघमारे यांचे चिरंजीव दयानंद वाघमारे आणि एस के फिल्म प्रोडक्शन चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नामदेव बल्लाळ मोहसीन जमादार रोहित सकटे सुरेश वाडकर यांचा सिंहाचा वाटा आहे या सर्वांचे लवकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या हस्ते स्वागत सत्कार होणार असल्याचे समजते. त्यामुळे या सर्वांचे टिम प्रमुख संजय कांबळे यांनी आभार मानले आहे. (फोटो आहेत)


No comments:
Post a Comment