Wednesday, 6 January 2021

चेंबुर आर.सी,एफ काँलनी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद !

चेंबुर आर.सी,एफ काँलनी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद !


"पंचरत्न मित्र मंडळ,चंद्रा सुंद्रा ट्रस्ट ,युथ काँन्सील यांचे या शिबिराला विशेष योगदान"


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :

             महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात उद्भवलेल्या उत्स्फुर्त  रक्त तुटवड्याची दखल घेऊन  पंचरत्न मित्र मंडळ, चंद्रा सुंद्रा ट्रस्ट ,व युथ काँन्सील यांच्या संयुक्त विद्यमाने लोरेटो कॉनवेंट स्कुल आर.सी.एफ कॉलनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आर. सी. एफचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक सन्मा. श्रीनिवास मुडगेरीकर  यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये बहुसंख्य कामगार बंधु व भगिनी यांनी रक्तदान केले. मंडळाच्या या शिबिराची मा. सी. एम. डी साहेबांनी प्रशंसा करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या या  समाजिक कार्यात मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानून  यापुढेही आपले असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पंचरत्न मित्र मंडळ(रजि.),चंद्रा सुंद्रा ट्रस्ट व युथ काँन्शील यांचे पदाधिकारी सदस्य व सभासद, हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...