कल्याण तालुक्यात ब्लडफ्यू चा प्रवेश, रायते आणि अटाळी येथे मृत कोंबड्यामध्ये आढळून आली लक्षणे !
कल्याण (संजय कांबळे) : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडतो न पडतोय तोच राज्यावर ब्लडफ्यू चे संकट कोसळले त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना केल्याने तो काही अंशी नियंत्रणात आला असतानाच आता कल्याण तालुक्यात ब्लडफ्यू ने प्रवेश केला असून रायते आणि अटाळी येथील मृत कोंबड्यामध्ये या रोगाची लक्षणे आढळून आले असून तसा अहवाल कल्याण तहसीलदारांना पाठविण्यात आला आहे. नांगरीकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन तहसीलदार व गटविकास अधिकारी कल्याण यांनी केले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जग त्रासून गेले आहे. महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावी पणे राबविली म्हणून कोरोना सारखी साथ आटोक्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग जवळपास कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. यामागे सर्व घटकांचे मोठे योगदान आहे. असे असताना राज्यात नवीन संकट उभे राहिले ते म्हणजे 'ब्लडफ्यू' चे? राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात ब्लडफ्यू ने शिरकाव केल्याच्या बातम्या टिव्ही वर येत होत्या. त्यामुळे पुन्हा नागरिकांना भितीयुक्त वातावरणात जगावे लागत होते. परंतु पशुसंवर्धन विभागाने वेळीच उपाययोजना करुन या संदर्भात काही नियम लागू केले. त्यामुळे भितीचे कारण नाही असे प्रशासन सांगत होते. पण या रोगाच्या विविध गैरसमज व अफवामुळे उलट सुलट चर्चा होऊन पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला. होता पण कल्याण तालुक्यात याचा फारसा परिणाम झाला नव्हता.
पण रायते आणि अटाळी येथील पोल्टी मधील मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथे व तेथून पुढे भोपाळ येथील वैदशाळेत पाठवले होते ते रिपोर्ट पाँझिटिव्ह म्हणजे या मध्ये ब्लडफ्यू ची लक्षणे आढळून आली असल्याने येथील एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे कल्याण पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ मधाळे त्यांची टिम व अंबरनाथ चे डॉ पवार हे घटनास्थळी धाव घेऊन सर्व परिसर क्लीन करित आहेत. रायते ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जगदीश मडके, विस्तार अधिकारी, स्वतः या टिमला सहकार्य व मदत करीत आहेत. तर या संदर्भात कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांना विचारले असता तो म्हणजे या बाबतीत शासकीय कामात काही अडचण आली आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहे. तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये पशुसंवर्धन विभागाची टिम पोहचली आहे. त्यांना सहकार्य करावे असे कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनी अवाहन केले आहे.


No comments:
Post a Comment