Tuesday, 19 January 2021

उल्हासनगर शहर वाहतूक शाखेत रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात !!

उल्हासनगर शहर वाहतूक शाखेत रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात !! 


कल्याण (संजय कांबळे) : शहर वाहतूक उप विभाग उल्हासनगर अंतर्गत उल्हासनगर कार्यालयाचे आवारात रस्ता सुरक्षा अभियान 2021 कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


सदर कार्यक्रमास उल्हासनगर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्री दत्ता तोटेवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत धरणे, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कदम, अंबरनाथ शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक श्री जाधव, पोलिस उपनिरीक्षक श्री साळुंखे, व वाहतूक पोलीस अंमलदार तसेच वॉर्डन तसेच व्यापारी उद्योजक, रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार पोलीस मित्र, उल्हासनगर मधील शाळा कॉलेजचे R.S.P. शिक्षक, आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियान 2021 आयोजित करून वाहतूक नियमांचे पालन व व सुरक्षित वाहतूक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच मा. न्यायालयाचे आदेशाने ज्या पासून मोठ्या प्रमाणात अपघाताला आळा बसेल असे महत्वाचे कलमा प्रमाणे कसूरदार वाहन चालकांवर कारवाई करण्यात येईल व चौका चौकामध्ये जाऊन, शाळा कॉलेज मध्ये जाऊन वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात येईल सर्वांनी वाहतुकींच्या नियमांचे पालन करून वाहतुक पोलसांना सहकार्य करावे असे आवाहन व.पो नि श्रीकांत धरणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...