Tuesday, 19 January 2021

म्हारळ ग्रामपंचायतीवर झेंडा कोणाचा? साईबाबा पॅनेल मधून निवडून आलेल्या सदस्यांची निर्णायक भूमिका !!

म्हारळ ग्रामपंचायतीवर झेंडा कोणाचा? साईबाबा पॅनेल मधून निवडून आलेल्या सदस्यांची निर्णायक भूमिका !!


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या सदस्य संख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीवर झेंडा कोणाचा असा प्रश्न उपस्थित झाला असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने साईबाबा पॅनेल मधून निवडून आलेल्या तीन सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार असून ते काय भूमिका घेतात यावर म्हारळ चा "कारभारी" किंवा कारभारीन 'कोण हे कळणार आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीवर भाजपाचे प्रमोद देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले होते. त्यांच्याच पक्षाच्या करिष्मा पगारे या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. पण मध्यंतरी सरपंच पदावरून बरीच उलथापालथ कोर्ट कचेरी झाली होती. अशातच या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. १७ जागांसाठी तब्बल ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. तरी खरी लढत शिवसेना व भाजप यांच्यात झाली. काल झालेल्या मतमोजणीत दिपक आहिरे, मोनिका गायकवाड, नंदा म्हात्रे, योगेश देशमुख, निलिमा म्हात्रे, विकास पवार, प्रमोद देशमुख, अमृता देशमुख, प्रकाश चौधरी, मंगला इंगळे, बेबी सांगळे, लक्ष्मण कोंगेंरे, प्रगती कोंगेंरे, अनिता देशमुख किशोर वाडेकर, वेदिका गंभीरराव, आणि अश्विनी देशमुख असे १७ सदस्य निवडून आले. परंतु कोणालाही सत्ता स्थापन करण्या इतपत बहुमत मिळाले नाही. भाजपा ७, शिवसेना ७,आणि इतर ३असे पक्षीय बलाबल झाले. 
यामध्ये वार्ड क्रमांक ६ मधून मा उपसरपंच निलेश देशमुख आणि मनसेचे उपतालुका प्रमुख विवेक गंभीरराव यांच्या साईबाबा पॅनेल च्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनेलचे ३ सदस्य भरघोस मतांनी निवडून आले. यामध्ये निलेश देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी कल्याण पंचायत समितीच्या मा सभापती यांच्या भावजई निकिता देशमुख यांचा पराभव केला. तसेच म्हारळ गावात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान मिळविला त्या १०४३ मतांनी विजयी झाल्या. मनसेचे विवेक गंभीरराव यांच्या पत्नी वेदिका गंभीरराव यांनी सानिध्या डोंगरे यांचा पराभव केला त्या १०४० मतांनी निवडून आल्या तर किशोर वाडेकर यांनी अर्चना अनिल पवार यांचा पराभव केला ते ८३२ मतांनी विजयी झाले. त्यामुळे आम्हाला मतदारांनी इतका मोठा कौल दिला आहे तर शिवसेनेने आम्हाला सन्मानाने बोलवायला हवे अन्यथा आम्ही तटस्थ राहू अशी भूमिका मनसेचे उपतालुका प्रमुख विवेव गंभीरराव यांनी बोलून दाखविली. तर आम्हाला सत्तेत सन्मान मिळाला तर आम्ही जरुर विचार करु असे मा उपसरपंच निलेश देशमुख यांचे म्हणणे आहे. 
एकूणच काय तर म्हारळ ग्रामपंचायतीवर झेंडा कोणाचा हे ठरविण्याचा अधिकार किंवा किंगमेकर? हे तीन सदस्य ठरणार का? हे सरपंच आरक्षणानंतर स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...