Wednesday, 20 January 2021

कल्याण तालुक्यातील २१ निकाल जाहीर : नडगांव-दानबाव मध्ये शिवसेनासेना तालुका प्रमुखांच्या पॅनलचा पराभव !

कल्याण तालुक्यातील २१ निकाल जाहीर : नडगांव-दानबाव मध्ये शिवसेनासेना तालुका प्रमुखांच्या पॅनलचा पराभव !


"अपक्ष उमेदवारांनी मारली बाजी"

उमेश जाधव, टिटवाळा-:- कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची १६४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे २० ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. सोमवारी सकाळी कल्याणमधील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात मतमोजणी शांततेत पार पडली. यात सर्वात चुरशीची  लढत असणाऱ्या नडगांव-दानबाव ग्रामपंचायत मध्ये शिवसेनासेना तालुका प्रमुखांच्या पॅनलचा अपक्षांनी दारून पराभव केला आहे.  


कल्याण तालुक्यातील अतिश्य महत्वाची व चुरशीची लढत असणरी ग्रामपंचायत नडगांव-दानबाव यांच्या निकालाकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले होते. यात शिवसेना तालुकाप्रमुख वसंत लोणे यांच्या मुलीसह संपूर्ण पॅनल पराभूत झाला आहे. यात अपक्ष उमेदवार शेखर लोणे व प्रमिला लोणे हे बहुमताने विजयी झाले आहेत. तर तालुका प्रमुख वसंत लोणे यांची मुलगी मोनिका लोणे यांना पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आले आहे. तालुका प्रमुख वसंत लोणे यांना जर आपल्याच मुलीला ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी करून आणता आले नाही तर इतरांसाठी ते किती काम करतील अशा प्रकाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच राज्यात महाआघाडीची सत्ता असतानाही कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपाच्या पारड्यात जादा ग्रामपंचायती पडल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर शिवसेना पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...