तुषार साळवी यांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुर्यकांत कासे यांच्या शेत तळयातील मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन करून केले वनविभागाच्या स्वाधीन !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगाव तिलोरे येथे श्री कासे सर यांचे स्वतःच्या मालकीचे शेततळे असून ते त्या तळ्यात मत्स्य व्यवसाय करतात. या वर्षी सुद्धा त्यांनी विविध प्रकारचे माशे सोडले होते. मात्र यावर्षी त्यांच्या तळ्यात अचानक पणे मगर शिरली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ ही बाब माणगाव वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली व मगर तल्यात असल्याची खात्री केली. त्याबाबतचा पंचनामा श्री वाघमारे यांनी स्वतः केला. मात्र अनेक दिवस उलटले तरी मगर काढणारी रेस्क्यू टीम उपलब्ध होऊ शकली नाही. मागरीने मोठ्या प्रमाणात माश्यांचे नुकसान केल्याचा अंदाज येत होता. त्यामुळे श्री कासे सर यांची चिंता वाढत होती. शेवटी गोरेगाव येथील सर्पमित्र तुषार साळवी हे मगर पकडतात अशी खबर मिळाल्यावर त्यांना पाचारण करण्यात आले त्यांनी जवळजवळ चार तास रेस्क्यू ऑपरेशन करून मगरीला पकडून वन खात्याच्या ताब्यात दिली. या मागरीची लांबी एक मीटर व रुंदी सहा इंच असल्याचे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी संघीतले.
या मागरीला सुरक्षित पणे गोरेगावच्या खाडीत वनखात्यामार्फत सोडण्यात आले. स्वतःचे खूप नुकसान होऊन सुद्धा कासे सरांनी या जलचर प्राण्याला जीवदान देऊन पर्यावरणाचे रक्षण केले त्यामुळे त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. या मागरीने केलेले नुकसान शासनाने भरून द्यावे अशी मागणी वनखात्याचकडे कासे सर करत आहेत त्यांची मागणी शासनाने मान्य करावी अशी विनंती आहे.

No comments:
Post a Comment