मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेकडून मुख्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकाशनाचे पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन !!
कल्याण, ऋषिकेश चौधरी : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेकडून मुख्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकाशनाचे पुस्तक प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले आहे. पालिकेकडून पहिल्यांदाच या प्रदर्शनाचे आयोजन करन्यात आले आहे.
20 जानेवारी पासून सुरु झालेले हे प्रदर्शन दोन दिवस चालणार असून यात विविध प्रकाशकांची सुमारे अडीच लाख पुस्तके मांडण्यात आली आहेत. उद्घाटनानंतर लगेचच या प्रदर्शनासाठी पुस्तक प्रेमींची गर्दी झाली होती. पूढील आठवड्यात डोंबिवली येथील पालिका मुख्यालयात या प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे .दरम्यान या पंधरवड्यादरम्यान पालिकेकडून फेसबुक लाईव्ह स्वरुपात साहित्यिकांचे अनुभव कथन ,पालिका कर्मचाऱयासाठी कोविड-19 चा स्वानुभव या विषयावर निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहे


No comments:
Post a Comment