Wednesday, 20 January 2021

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने आशिष शिंदे यांचा सत्कार !

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने आशिष शिंदे यांचा सत्कार !


अमळनेर, प्रतिनिधी - हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दुसऱ्यांदा बहुमताने निवडून आले त्यांचा अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष दीपक पवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव दिलीप पाटील जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संघटक डॉ किरण निकम,प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन, सदस्य सोपान भवरे,मुनाफ तडवी होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी अध्यापक मंडळाचे सचिव दिलीप पाटील यांनी केले हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचा सपत्नीक अध्यापक मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की हिंदी अध्यापक मंडळ आणि मला नेहमीच शैक्षणिक व सामाजिक काम करत असताना प्रेरणा दिली आहे आज माझा माझा परिवारातील सदस्यांचा सन्मान करून निश्चितच गावातील विकास कामे करण्यात मला  प्रेरणा मिळेल. सदैव मी हिंदी अध्यापक मंडळाचा ऋणी राहील असे सांगितले. यावेळी एन.आर.चौधरी, डॉ किरण निकम,सोपान भवरे यांनी हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार प्रदर्शन उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86% निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ !!

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86%  निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ !! ** आर्थिक व्यापारगतीचे प्रतिबिंब ...