Friday, 22 January 2021

आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पत्रकार संजय कांबळे यांची भेट!

आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पत्रकार संजय कांबळे यांची भेट!


कल्याण (प्रतिनिधी) : एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस कल्याण चे टिम प्रमुख तथा पत्रकार संजय कांबळे यांनी नुकतीच आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला भेट दिली यावेळी नवीन चित्रपट व गाणी आदी विषयांवर सह कार्यवाहक श्रीमती चैत्राली डोंगरे यांच्याशी चर्चा केली.
चित्रपटातील सिनेतारखा व अभिनेते यांच्या झगमगत्या दुनियेचे नेहमीच सर्वसामान्य जनतेला आकर्षण असते. हे बघून शेकडो तरुण तरुणी इकडे तिकडे भटकत असतात. यातून ब-यावेळा त्यांची फसवणूक होते. ऐवढेच नव्हे तर कित्येकदा त्यांचे आयुष्य बरबाद होते. या सर्व गोष्टींचा विचार करून, खरेच असे होते का? चित्रपट सृष्टीत येवू पाहणाऱ्या नवीन कलाकार, दिग्दर्शक निर्माते व तंत्रज्ञ यांनी काय करायला हवे, शासन याठी काय करते. आदी विविध प्रकारचे प्रश्न व समस्या अडचणी संदर्भात माहिती घेण्यासाठी पत्रकार तथा एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेचे टिम प्रमुख संजय कांबळे यांनी मुंबई च्या आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला भेट दिली.
यावेळी कार्यालयात उपस्थित महामंडळाच्या सह कार्यवाहक चैत्राली डोंगर, शाखा व्यवस्थापक विशाल पवार, अंकिता कदम, मावशी  आदीशी नवीन चित्रपट, कलाकार, निर्माते व दिग्दर्शक, मराठी साॅग, आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावर सह कार्यवाहक चैत्राली डोंगरे, विशाल पवार, अंकिता कदम यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पत्रकार संजय कांबळे यांनी त्यांच्या भावी प्रोजेक्ट बाबत सविस्तर चर्चा केली. 

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...