Friday, 22 January 2021

निवडून आलेल्या सदस्यांपैकी गावाचे खरे कारभारी कोण हे तीन फेब्रुवारीच्या आरक्षणानंतरच स्पष्ट !!

निवडून आलेल्या सदस्यांपैकी गावाचे खरे कारभारी कोण हे तीन फेब्रुवारीच्या आरक्षणानंतरच स्पष्ट !!


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या१६४ सदस्यांपैकी गावाचे खरे कारभारी कोण? हे येत्या ३ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणा-या सरपंच आरक्षणानंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत सदस्यांना एकत्रित ठेवणे 'लिडर, ला खूपच आर्थिक त्रासदायक ठरत आहे.
तालुक्यातील वरप ग्रामपंचायत १३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित २० ग्रामपंचायतीसाठी नुकतेच मतदान व मतमोजणी झाली. यामध्ये म्हारळ ग्रामपंचायतीचे १७, बेहरे १७, कांबा १३, गुरवली ९,जांभूळ मोहिली ९,म्हसकळ अनखर ९,वडवली शिरढोण ९,निंबवली मोस ७,उतणे चिंचवली ९,गोवेली रेवती ९,खोणी वडवली ११, नवगाव बापसई ७,आपटी मांजर्ली ९,आणे भिसोळ ९,रायते पिंपळोली ९, मानिवली ९असे उमेदवार निवडून आले आहेत.तालुक्यात बेहरे, मानवली रायते कांबा आदी ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता येवू शकते. पण म्हारळ, खोणी वडवली इत्यादि ठिकाणी घोडेबाजार मोठ्याप्रमाणात होऊ शकतो. तसे पाहिले तर सर्वच ग्रामपंचायतीमध्ये पैशांचा बाजार मांडला होता. यामुळेच तर भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव झाला. यावरून मतदान हे दान राहिले आहे का? याचा विचार करा.
कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये तर पैशांचा पाऊस पडला काही उमेदवारांनी घरोघरी जाऊन पैसे वाटले. त्यामुळे चांगले उमेदवार पडले असा आरोप कल्याण पंचायत समितीच्या मा सभापती रंजना देशमुख यांचे पती केतन देशमुख यांनी केला आहे. आता येथे कोणालाही बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जे "लिंबू टिंबू" आहेत. त्यांनी त्यांचा भाव एकदम वाढवला आहे. तर ज्या मतदारांनी विश्वासाने सदस्यांना निवडून दिले. त्यांच्यावर वरिष्ठांना विश्वास नसल्याने अशांना अज्ञातस्थळी हलविले आहे. ते आता आरक्षण पडे पर्यंत तरी मौजमजा करायला मोकळे.
अमुकतमुक पक्षाचा मी कट्टर समर्थक असे सांगणारे अचानक कधी कुठे उड्या मारतील याचा काही नेम नाही. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी पडणारे आरक्षण काय पडते यावर यांची निष्ठा अवलंबून असणार आहे. त्यामुळे इतक्या ग्रामपंचायतीवर आमचा झेंडा असा दावा करणारे पुढारी ३ फेब्रुवारी नंतर हा दावा करतील का हा खरा प्रश्न आहे. म्हणून आरक्षणानंतर गावचे खरे कारभारी कोण हे स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...