Friday, 8 January 2021

माणगांव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले शेतकर्यांचे मोठे नुकसान ! शासकीय मदतीची गरज !

माणगांव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले शेतकर्यांचे मोठे नुकसान ! शासकीय मदतीची गरज !


      बोरघर /माणगांव ( विश्वास गायकवाड  ) गुरूवार दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी संपूर्ण माणगांव तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकर्यांचे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याला बसलेल्या प्रलयंकारी चक्रीवादळाच्या फटक्यात माणगांव तालुक्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 
    या चक्रीवादळाच्या तडाख्यात माणगांव तालुक्यातील सर्व छोटे मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योजक आणि तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या चक्रीवादळा मध्ये लोकांची घरे, इमारती, जनावरांचे गोठे, धन धान्ये, बागायती शेतकर्यांच्या आंबा, काजूच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 
      माणगांव तालुक्यातील जनतेला झालेल्या चक्रीवादळाच्या जखमा ओल्या असताना व त्यातून ही सर्व पीडित जनता बाहेर येते न येते तोच निसर्गातील अनपेक्षित बदलांमुळे माणगांव तालुक्यात वेळी अवेळी वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक, वीटभट्टी व्यावसायिक    आणि शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे माणगांव तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतातील कडधान्ये, भाताच्या मळण्या, जनावरांचे साठवण करून ठेवलेले खाद्य, गवत,पेंढा आणि या अवकाळी पावसाने अांबा काजूचा मोहर गळून पडल्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानातून वर येण्यासाठी तालुक्यातील सर्व बाधीत शेतकर्यांना शासनाच्या सढळ मदतीची गरज आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...