Friday, 8 January 2021

लग्नाच्या वर्हाडाचा टेम्पो पोलादपूर कुडपण येथे तीनशे फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात !

लग्नाच्या वर्हाडाचा टेम्पो पोलादपूर कुडपण येथे तीनशे फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात !


         बोरघर  / माणगांव  ( विश्वास गायकवाड )  रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खवटी गावातून लग्नाचे वर्‍हाड ७०९ टॅम्पो क्रमांक एम एच ०८ जी ३०३७ ने  शुक्रवार दिनांक ८ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील कोंडूशी येथे लग्नाला गेले होते. लग्न लावून परत येताना सदर टॅम्पोस अपघात होवून सुमारे ३०० फूट खाेल दरीत सदर टॅम्पो कोसळला आणि मोठा अपघात झाला. कुडपण धनगरवाडी जवळ एका अवघड वळणावर हा अपघात झाला. पोलादपूर मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे हा रस्ता निसरडा झाला होता. या मुळे हा अपघात झाला असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
      या घटनेनंतर स्थानिक प्रशासन यंत्रणा,आरोग्य यंत्रणा पोलीस यंत्रणा महाड, कोलाड, महाबळेश्वर रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले.
        आतापर्यंत ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथे ४३ जखमींना दाखल केले असून ३ जणांचा मृत्यू झाला आला आहे. 
       सहा जखमींना एमजीएम, कळंबाेली आणि जिल्हा रुग्णालय,अलिबाग या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
         पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे आणि आमदार भरतशेठ गोगावले तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणा ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर या ठिकाणी पोहोचल्या आहेत. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने, आरोग्य यंत्रणेने परिस्थिती उत्तमरित्या हाताळली आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...