Friday, 8 January 2021

सिद्धगडाच्या सान्निध्यात संपन्न झाला शिक्षक संघटन दिन !!

सिद्धगडाच्या सान्निध्यात संपन्न झाला शिक्षक संघटन दिन !!


मुरबाड {मंगल डोंगरे} : मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने काल गुरुवारी सिद्धगड येथील हुतात्मा स्मारक परिसरात शिक्षक संघटनदिन साजरा करण्यात आला .यावेळी उपस्थित शिक्षकांनी स्मारक परिसराची स्वच्छता केली.


      संघटन दिनानिमित्त ब्रिटिश सरकारला न घाबरता सिद्धगड येथे हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचे अग्नी दहन करण्यासाठी आपली खाजगी जागा देणाऱ्या घिगे कुटूंबीयांतील सावळाराम घिगे यांच्या हस्ते महिलांना फळवाटप व साडीवाटप करण्यात आले. तसेच हुतात्मा समाधी , हुतात्मा ज्योत व परिसरात स्वच्छता करण्यात आली यावेळी राज्य स्तरीय काव्यलेखन स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या शिक्षिका दिपश्री ईसामे व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या यशवंत माळी यांचा सत्कार करण्यात आला .
    कार्यक्रमाचे अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष भागवत पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान भगत, तालुका अध्यक्ष सोमनाथ सुरोशे, दिव्यांग प्रहार संघाचे राज्य सचिव काशिनाथ राऊत, शिक्षक नेते जयवंत मुरबाडे उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ सुरोशे यांनी, सुत्रसंचालन यशवंत माळी तर आभार प्रदर्शन रविंद्र मोहपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष सोमनाथ सुरोशे ,सचिव शैलेश ईसामे, कार्याध्यक्ष रविंद्र मोहपे ,कोषाध्यक्ष यशवंत माळी , उपाध्यक्ष भरत भांडे, कांचन चौधरी, रंजना डोहळे, प्रसिद्धीप्रमुख सोपान गोल्हे, नरेश परदेशी, दिनेश नागवंशी, विष्णू पारधी, पांडुरंग धलपे यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...