आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातील बाराशेबारा गावातून बी म्युझिक चॅनेलवरुन एस के फिल्म चे सुपरहीट गाणे वाजणार !!
मुंबई (संजय कांबळे) : सातारा, सांगली जिल्ह्य़ातील घराघरातून वाजणारे व गाजणारे एस के फिल्म प्रोडक्शनच्या बॅनर खाली निर्माण झालेले व महाराष्ट्राच्या बुलंद आवाजाचे शिंदेशाही घराण्यातील प्रसिद्ध गायक समर्थक शिंदे यांच्या टिपेला जाणाऱ्या सुमधूर आवाजात गायलेले 'दिलाय तिघींनी मला धोका' हे गाणे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अश्या 'बी' म्युझिक या चॅनेलवरुन १२तालूक्यातील सुमारे १२१२ गावातून दाखविण्यात येणार असून त्यासाठी या चॅनेलचे सर्वेसर्वा मा ना मुन्ना महाडिक यांचे आणि त्यांचे सहकारी सूरज निकम, अनिल पाटील, प्रल्हाद माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
जनाधार निर्भीड पत्रकार सेवा संस्था (रजि) संचलित एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या बॅनर खाली वेगवेगळ्या मराठी गाण्याचे अल्बम काढण्याचे काम सुरू आहे. आपल्या वैविध्यपूर्ण कलागुणांमुळे व काहीतरी हटके करून दाखविण्याच्या प्रयत्नामुळे अल्फावधीत एस के फिल्म प्रोडक्शन ही संस्था कलारसिकाच्या चर्चेचा विषय ठरली आहे. यांनी नुकताच मराठी गाण्यांच्या अल्बम पैकी 'दिलाय तिघींनी मला धोका' हे गाणे लाॅच केले. प्रसिद्ध गायक समर्थक शिंदे यांनी गायलेल्या या साॅग मध्ये अभिनेते सिधू गायकवाड (शांताबाई फेम) साक्षी पाटेकर, दिव्या गायकवाड, गौरी पाटील, वैष्णवी धायगुडे, नागराज बल्लाळ, मोसीन जमादार, रोहित सकटे, सुरेश वाडकर आणि बालकलाकार हिंमाशू कांबळे यांनी अभिनय व डांन्स केला आहे.
सध्या हे गाणे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. सांगली, सातारा या जिल्ह्य़ासह महाबळेश्वर, फलटण, खंडाळा, वाई, मान, खटाव, कराड आदी तालुक्यातील घराघरातून गाजत आहे. त्यामुळे आपल्या छोट्याश्या बैलवडे बुद्रूक या गावाचे कराड तालुक्याचे नाव चमकविणा-या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेच्या कलाकारांचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नुकताच सातारा जिल्ह्यातील बेलवडे या गावी सत्कार करण्यात आला.
आता यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील. वजनदार घराणे व प्रतिष्ठित नाव मुन्ना महाडिक यांच्या सहकार्याने तसेच यांचे सहकारी सूरज निकम यांच्या प्रयत्नातून 'बी "म्युझिक या ३४७ नंबर चॅनेलवरुन आज म्हणजे रविवार पासून कोल्हापूर जिल्ह्यातील १० तालुक्यातील सुमारे १२१२ गावातून एस के फिल्म प्रोडक्शन कल्याण - मुंबई चे दिलाय तिघींनी मला धोका" हे गाणे दिसणार आहे. शाहुवाडी तालुक्यातील १४१ गावे, पन्हाळा १२७, हातकणंगले ५९, शिरोळ ४९, करवीर १३१, गगनबावडा ४२, राधानगरी १२२, कागल ८३, भुदरगड ११४, चंदगड १५५, अशा सुमारे १२१२ गावातून बी म्युझिक चॅनेलवरुन हे गाणे दिसणार वाजणार व गाजणारही आहे.
या अनमोल सहकार्याबद्दल या बी म्युझिक चे हेड मा मुन्ना महाडिक, त्यांचे सहकारी सुरज निकम, वडगावचे अनिल पाटील, भेंडवडेचे प्रल्हाद माने या सर्वांचे एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस कल्याण मुंबई चे प्रमुख पत्रकार संजय कांबळे यांनी आभार मानले आहे.


No comments:
Post a Comment