Friday, 19 February 2021

लस घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग.....

लस घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग.....
 

मुंबई : महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात करोनाची लस घेतल्यानंतरही डॉक्टर आणि आरोग्यसेविका करोनाबाधित झाल्याचे उघड झाले आहे. 
त्यामुळे करोनाच्या प्रतिबंधासाठी देण्यात येणाऱ्या लशीच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लस घेतलेल्या दोघांनाही मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
४६ वर्षांचा डॉक्टर लस घेतल्यानंतर नऊ दिवसांनी, तर ५० वर्षांची आरोग्यसेवक लस घेतल्यानंतर चार दिवसांनी करोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले. 

दोघांनाही कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली होती. डॉक्टरने ३० जानेवारीला लस घेतली होती आणि त्यांच्यावर लशीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत. परंतु ९ फेब्रुवारीला त्यांना अंगदुखी, ताप आणि सर्दीचा त्रास जाणवू लागला. चाचणी केली असता ते करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
दुसऱ्या प्रकरणात आरोग्यसेविकेला लस घेतल्यानंतर चार दिवसांनी ताप आला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लस घेतल्यानंतर लागण झाल्याच्या एका घटनेची नोंद झाली असून ती खासगी रुग्णालयातील होती. 

याव्यतिरिक्त अशी काही प्रकरणे झाली आहेत का ?, याची माहिती घ्यावी लागेल.

करोना संसर्ग झालेल्यांनी कळवल्यास याची नोंद होईल. 
लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालिकेच्या कार्यकरी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...