Thursday, 11 February 2021

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीतर्फे २२ फेब्रुवारी रोजी कामगारांचा आक्रोश मोर्चा !!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीतर्फे २२ फेब्रुवारी रोजी कामगारांचा आक्रोश मोर्चा !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

           रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कामगार आघाडीच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथे कामगारांचा आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आले आहे कामगारांच्या विविध प्रश्न विविध मागण्यासाठी कामगार आघाडीच्या वतीने कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना कामगारांच्या विविध मागण्याचे एक विशेष शिष्टमंडळ भेटणार आहे. कोरोना महमारीच्या काळात अनेक कामगार बेरोजगार झाले आणि नाका कामगारांच्या हाताला काम नाही आणि शासनाकडे नाका कामगारांची नोंदणी सध्या नसल्याने कामगाराला कुठलेही वेतन मिळत नाही याबद्दल कामगारांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे त्यामुळेच हा आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे, सरचिटणीस गुणवंतराव नागटिळे, कामगार आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोकभाऊ कांबळे, हवेली तालुका कार्याध्यक्ष परवेज भाई, युवानेते योगेश सूर्यवंशी आदी मान्यवरांनी  पत्रकार परिषदेत जाहीर केले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...