भाजप चित्रपट कामगार आघाडीचा सिने सन्मान कार्यक्रम संपन्न !
कल्याण प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष संलग्न भाजप चित्रपट कामगार आघाडी यांनी सोमवार दिनांक ०८/०२/२०२१ रोजी जेष्ठ कलावंतांचा सन्मान, सिने कलाकारांचा सन्मान, नवीन पद नियुक्ती असा कार्यक्रम कल्याण येथील के सी गांधी सभागृहात आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या कल्याण येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध व थाटात पार पडला.
या कार्यक्रमाला ठाणे व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, व ग्रामीण भाग, तसेच रायगड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरातील अशा ७५ नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी नृत्य आविष्कार सादर केले.
सदर कार्यक्रमासाठी संजय केनेकर (कामगार नेते), विजय सरोज (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष : चित्रपट कामगार आघाडी), मा. आमदार नरेंद्र पवार (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश : भटक्या विमुक्त जाती), रेखा चौधरी (कल्याण जिल्हा महिला अध्यक्ष, भाजपा), प्रेमनाथ म्हात्रे (कल्याण शहर अध्यक्ष, भाजपा), संजय रणदिवे (ठाणे जिल्हा प्रभारी / उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश : चित्रपट कामगार आघाडी), आनंद म्हस्के (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश), राकेश ठाकूर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश), सुषमा ठाकूर (ठाणे शहर अध्यक्ष), नेत्रा विजय राणे (रायगड जिल्हा अध्यक्ष), चंद्रशेखर कुलकर्णी (बदलापूर शहर अध्यक्ष) सर्व चित्रपट कामगार आघाडी उपस्थित होते. नृत्य व्यवस्थापन संदेश पाटील, तर निवेदन मराठी कलाकार प्रणव भांबूरे यांनी केले.


No comments:
Post a Comment