Wednesday, 10 February 2021

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते, सिधुदुर्ग बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांची सदिच्छा भेट. !!

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते, सिधुदुर्ग बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांची सदिच्छा भेट. !!


"पालक मंत्र्यांसोबत बैठक घेवून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन"

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : अरुणा प्रकल्पग्रस्त २०१३ च्या नव्या भुसंपादन कायद्या प्रमाणे चौपट नुकसानीस पात्र असताना १८९४ च्या कायद्याने तुटपुंजा मोबदला देऊन अरुणा प्रकल्पग्रस्तांची प्रशासनातील काही अधिकारी आणि बुवा सह तिन दलालांनी घोर फसवणुक केलेली आहे. प्रकल्पग्रस्तांची राहती घरे बुडवण्याचा अधिकार प्रशासकीय यंत्रणेला कोणी दिला. असे सवाल उपस्थित करीत अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफीयत शिवसेना नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बाॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांच्या कडे मांडली. अरुणा, नरडवे आदि सर्वच प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याच्या जण भावना आपल्या पर्यन्त येत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी आपल सर्वस्व सोडुन इतर गावाच्या विकासासाठी त्याग केलेला आहे. त्याना वा-यावर सोडता येणार नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत याच्या उपस्थितीत अरुणा प्रकल्पग्रस्तांची बैठक आयोजीत करुन न्याय दिला जाईल असे अभिवचन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, शिवसेना नेते सतिश सावंत यांनी दिले आहे.  

१० फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवसेना नेते सतिश सावंत यांची ओरस येथील जिल्हा बॅंकेच्या त्यांच्या मुख्य प्रशस्त दालणात लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम, महिला अध्यक्षा सुचिता चव्हाण, संतोष चव्हाण, मुकेश कदम, शिवाजी सावंत, संदेश बांद्रे, श्रीकांत बांद्रे यांनी भेट घेतली. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर पाटील उपस्थित होते. 

गेल्या आठवड्यात अरुणा प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी चे वैभववाडी तहसिलदार कार्यालयावरील लक्षवेधी उपोषण यशस्वी झाल्या नंतर लेखी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न करता प्रकल्पाचे बंद केलेले काम दुसऱ्याच दिवशी चालु केल्याने संतप्त अरुणा प्रकल्पग्रस्तांनी पाण्याचा विसर्ग बंद तर काम बंद असा नारा देत प्रकल्पग्रस्तांनी अरुणा प्रकल्पाच्या पिचींग चे आणि कालव्याची कामे बंद पाडली आहेत. गेल्या पंधरा वर्षात पहिल्याद्याच अरुणा प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाची कामे बंद पाडल्याने प्रकल्प स्थळी साम सुम आहे. 

मोबदला नाही, भुखंड नाही, पुनर्वसनाचा पत्ता नाही, कालवे तयार नसताना अरुणा प्रकल्पाची गावातील बुवा सह तिन दलालांच्या मदतीने बेकायदेशीर घळभरणी करुन अरुणा प्रकल्पग्रस्तांची १३० घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत. प्रकल्पात बुडालेल्या घरांचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळाली पाहीजे. प्रकल्पग्रस्तांना प्रलंबित असलेले घरभाडे २०१३ च्या कायद्या नुसार अतिरिक्त नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ठप्प असलेली पुनर्वसनातील कामे चालु करा. प्रलंबित भुखंड धारकांना भुखंड वाटप करा. किंजळीचा माळ पुनर्वसन गावठण मांगवलीगावठणाला जोडा. राहीलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या त्रुटीची नोंद करुन नुकसान भरपाई द्या. बुवा सह तिन दलाल आणि त्याच्या नातेवाईकांना देण्यात आलेल्या त्रुटीच्या नावा खाली दिलेल्या लाखो रुपयांची चौकशी करा. अरुणा प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेतजमीन मिळाली पाहीजे. या व इतर मागण्यांन बाबत प्रकल्पग्रस्तांच्या वतीने जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवसेना नेते सतिश सावंत याच्याशी व्यापक चर्चा केली. 

अरुणा नरडवे प्रकल्पासह जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी आपले घर, दार, जमिन, जागा आणि आपल सर्वस्व गमावल आहे. इतर गावांचा विकास होताना ज्यांनी आपल सर्वस्व गमावल आहे ते प्रकल्पग्रस्त उदव्स्त होता कामा नयेत. प्रकल्पग्रस्तांना देय असलेली नुकसान भरपाई कोणाच्या खिशातुन जाणार नसुन शासनाचा पैसा खर्च होणार आहे. अरुणा प्रकल्पग्रस्तांवर झालेला अन्याय त्याचे प्रश्न व समस्या जाणुन घेऊन २० फेब्रुवारी २०२१ पर्यन्त अरुणा प्रकल्पग्रस्तांची बाठक आयोजीत केली जाईल. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाची कदर करुन त्यांच्या वर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही. असे अभिवचन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवसेना नेते सतिश सावंत यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांना दिले. 

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम, महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण, संतोष चव्हाण, मुकेश कदम, शिवाजी सावंत, संदेश बांद्रे, श्रीकांत बांद्रे आदि पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवसेना नेते सतिश सावंत यांचे आभार मानले.
-------------------------------

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...