**कामगारांच्या न्याय हक्कासाठी सिटु संघटना टेक्नोक्राफ्ट कंपनीला ठोकणार टाळे **
मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील मौजे धानिवली येथील टेक्नो पाँवर प्लान मधील कामगारांना अचानक पणे कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी सिटु संघटनेच्या वतीने टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा सिटु संघटनेने दिला आहे.
मे.टेक्नोक्राफ्ट इंड्र. इंडिया. लि. धानिवली मुरबाड (पाॅवर डिव्हीजन) या कंपनीने लाँकडाऊन काळावधीत बंदच्या नावाखाली एकुण 54 कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले.हे कामगार स्थानिक भुमिपुत्र असुन, कंपनी उभारण्यासाठी काही कामगारांची जमीनही गेली आहे. आणि हि जमीन देण्या मागचे कारण धानिवली गाव व तालुक्यातील स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार मिळावा. तसे कंपनी व्यवस्थापनाने नोव्हेंबर 2008 मध्ये गाव वाचवा कृती समिती धानिवली यांच्या सोबत लेखी करार केलेला आहे. आणि करारा नुसार स्थानिक भुमिपुत्रांना कायमस्वरूपी म्हणून कामावर घेण्यात आले. 10 ते 12 वर्षापासून काम करत असतांना लाॅकडाउन काळात कंपनी व्यवस्थापनाने पाॅवर डिव्हीजन बंद केल्याचे दाखवून या कामगारांना बंद केले आहे. हे सर्व कामगार सिटू युनियनचे सभासदत्व स्विकारले आहे. युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यासोबत "मा. सहाय्याक कामगार आयुक्त" कल्याण, 'मा.पोलिस स्टेशन मुरबाड', कंपनीच्या आॅफीसमध्ये, नवी मुंबई वाशी White House येथे "आमदार मा.गणेशजी नाईक साहेब" व मा.उपसभापती मा.दिपकजी खाटेघरे या सर्वासोबत अनेकानेक बैठका होऊन या कामगारांना कामावर घेण्याचे मान्य करून सुद्धा तसेच विधान सभा अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांनी सुध्दा प्रशासकीय अधिकार्याना कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सुचना दिल्या होत्या. परंतु कंपनीचे व्यवस्थापन सतत पळवाटा काढत आहे. उदा. हिशोब घ्या, थोड्या फार कामगारांना कामावर घेतो, ट्रेनी म्हणून घेतो हे काय सिटू युनियनला मान्य नाही. 54 कामगारांचा प्रश्न आहे सर्वांना कंपनी अंतर्गत चालू असलेल्या T shirt, कपडा प्लॅन, धागा प्लॅन यामध्ये जवळपास 2500 कामगार काम करतात ह्या ठीकाणी कामावर घेण्यात यावे, लाॅकडाउन काळातील थकीत पगार देण्यात यावे. हे "सिटू युनियन राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. डाॅ. डि. एल. कराड साहेब" यांचे म्हणणे आहे. युनियन आली म्हणून काय आम्ही कंपन्या बंद करायला आलो नाही. कंपन्या चालल्या पाहिजेत तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल याची काळजी युनियन घेत असते. जवळचीच मिंडासाई कंपनी संघर्ष चालू होता. परंतु अनेक वेळा बैठका होऊन प्रश्न मार्गी लागून 7000 ते 7500 पर्यंत पगार वाढ व सुमारे 120 कामगारांना कायमस्वरूपी करण्यात आले. हा करार मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक करार आहे. आपण गेली 20 ते 25वर्षापासून बघतोय जो कामगार कॉन्टॅक्ट मध्ये काम करतो तो कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. म्हणून टेक्नोक्राफ्टचे 21/12/2020 पासून चालू असलेले उपोषण हा 54 कामगारांचा मुद्दा नाही. जवळचा परिसर, मुरबाड तालुक्याचा, मराठी माणसाचा प्रश्न आहे. यासाठी शुक्रवार दि. 12/02/2021 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. *टेक्नोक्राफ्ट इंड्र. इंडिया. लि. धानिवली, मुरबाड (कल्याण हायवे)* गेटवर टाळे ठोक घेराव आंदोलन यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन सिटु तालुका अध्यक्ष दिलीप कराळे. व सेक्रेटरी सागर भावार्थे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment