Wednesday, 10 February 2021

कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी श्रीमती भारती भगत आणि उपसरपंच पदी संदिप पावशे यांचा विजय, शिवसेनेला मोठा झटका?

कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी श्रीमती भारती भगत आणि उपसरपंच पदी संदिप पावशे यांचा विजय, शिवसेनेला मोठा झटका?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अनुसूचित जाती या प्रवर्गातील श्रीमती भारती महेंद्र भगत तर उपसरपंच पदी संदिप पावशे यांचा विजय झाला असून येथे शिवसेनेला मोठा झटका बसला आहे तर उपस्थित कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस व टिम ओमी कालानी यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या जात असल्याने कांबा ग्रामपंचायतीवर नेमकी सत्ता कोणाची या बाबतीत मात्र लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे
कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत ही औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित पडले होते. यावेळी या आरक्षणा विरोधात काही लोकांनी अक्षेप घेतला होता. ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सोनाली उबाळे, पद्माकर सुरोशे, दत्ता भोईर, सुंगधा पावशे, वंदना पावशे, अरुण सुरोशे, छाया बनकरी (बिनविरोध) उषा गावडे, संदीप पावशे, संतोष पावशे, ईशा भोईर, हरिदास सवार आणि भारती भगत असे १३ सदस्य निवडून आले होते. यामध्ये शिवसेनेचे पुर्ण पॅनेल म्हणजे ६ सदस्य विजयी झाल्याने कांबा ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार असे वाटत होते. परंतु पुर्वापार सेनेचे सदस्य व माजी सरपंच संदिप पावशे यांनी गेम पलटी केली. बिनविरोध निवड झालेले व इतर काही सदस्यांना घेऊन बहुमतासाठी आवश्यक असलेला ७ हा जादुई आकडा जमविला. आणि विजयश्री खेचून आणली. त्यामुळे शिवसेनेचे स्वप्न भंग पावले.


आज झालेल्या सरपंच आणि उपसरपंच पदासाठी अनुक्रमे भारती महेंद्र भगत, उषा भास्कर गांवडे तर उपसरपंच पदासाठी संदिप कुंडलिक पावशे व वंदना विठ्ठल पावशे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यावेळी झालेल्या मतमोजणीत संरपच भारती भगत व उपसरपंच संदिप पावशे यांना अनुक्रमे ७,७ मते तर उषा गांवडे व वंदना पावशे यांना ६,६ अशी मते मिळाली त्यामुळे सरपंच पदी भारती भगत व उपसरपंच पदी संदिप पावशे यांची निवड झाली.
यावेळी कांबा ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. उत्साही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, टिम ओमी कालानी यांचा विजय असो, तर मधेच कोणीतरी महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत असल्याने कांबा ग्रामपंचायतीवर नेमकी सत्ता कोणाची या बाबतीत मात्र लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती दिसत होती.
यावेळी कांबा ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे स्वप्न भंगले हे सेनेचे सदस्य कार्यालया बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. 
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कल्याण पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे जे एन गहाणे, यांनी काम पाहिले तर ग्रामविकास अधिकारी ए जे इंगोले, लिपिक गुरुनाथ बनकरी, आदी कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी या परिसरातील गर्दी पाहता  येथे पोलीस बंदोबस्त आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...