Saturday, 13 February 2021

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी घेतला कोविशिल्डचा दुसरा डाेस !!

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी घेतला कोविशिल्डचा दुसरा डाेस !!


"कोविशिल्डचा दुसरा डोस देणारे डॉ.सुहास माने जिल्ह्यातील पहिले अधिकारी"

      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्हा रूग्णालयातील विशेष लसीकरण कक्षात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी आज शनिवार, दिनांक १३ फेब्रुवारी रोजी "काेविशिल्ड" लस चा दुसरा डाेस घेतला. 
     बरोबर २८ दिवसांपूर्वी डॉ. सुहास माने यांनी काेविशिल्ड लस चा पहिला डोस घेतला होता. यानिमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माने यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाने आपला "काेविशिल्ड" अथवा "काेविन" लसचे दाेन्ही डोस पूर्ण करावेत. कारण परदेशात जाताना लसचे दाेन्ही डोस पूर्ण घेतलेल्यांनाच परवानगी दिली जाणार आहे.
     यावेळी  जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ,प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ,गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तांभाळे, डॉ.दिपाली राजपूत, डॉ.अमोल खरात, अधिसेविका जयश्री मोरे, सहाय्यक अधीक्षक सिद्धार्थ चौरे, सार्वजनिक आरोग्य सेविका उषा वावरे, अधिपरिचारिका नम्रता नागले व इतर आराेग्य कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...