धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ अँड मुरली पणीकर यांची तानाजी कांबळे यांनी घेतली सदिच्छा भेट !!
मुंबई, प्रतिनिधी :
तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील, वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्प ग्रस्तांचे नेते तानाजी कांबळे यांनी धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत अरुणा प्रकल्प ग्रस्तांवर झालेल्या अन्यायाची माहिती तानाजी कांबळे यांनी धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ अँड मुरली पणीकर यांना दिली.
सामाजिक कार्यकर्ते उत्तम भगत यावेळी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्त आपले सर्वस्व गमावून शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना साथ देत असतात. अश्या वेळी शासनाने प्रकल्प ग्रस्तांकडे सहानुभूतिने पाहणे आवश्यक आहे.
ज्या अधिका-यांनी प्रकल्प ग्रस्तांवर अन्याय केलेला आहे त्या अधिका-यांची चैकशी आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे निश्चित पाठपुरावा केला जाईल. प्रसंगी अॅड. नारायण पणीकर यांच्या माध्यमातुन मा. उच्च न्यायालयात व मा. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे अभिवचन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्प ग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांना दिले.
आखवणे, नागपवाडी, भोम प्रकल्प ग्रस्तांच्यावतीने तानाजी कांबळे यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे आणि धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नारायण पणीकर यांचे आभार मानले.
----------------------------------


No comments:
Post a Comment