मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात बिबट्याचा मृत्यू; !
"मदतीऐवजी लोक काढत होते फोटो"........
मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघऱमधील दुर्वेश गावच्या परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे .
बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत बिबट्याच्या शेजारी बसून फोटो काढत होते.
गेल्या वर्षभरामध्ये अशाच प्रकारे अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे आतापर्यंत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने बऱ्याच ठिकाणी घनदाट जंगल आहे. येथे रात्रीच्या वेळी बिबटे भक्ष्याच्या शोधात महामार्गावर येतात. अनेकदा अंधारात प्राणी न दिसल्याने वाहनांच्या धडकेत त्यांचा मृत्यू होतो.
महामार्गाच्या ज्या भागात घनदाट जंगल आहे व वन्यप्राणी रस्त्यावर येऊ शकतात अशा ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला संरक्षक जाळ्या वनविभागाने बसवाव्यात जेणेकरुन अशाप्रकारे दुर्मिळ वन्यजीवांचा मृत्यू होणार नाही अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे .

No comments:
Post a Comment